Friday, May 3, 2024
Homeनगरनाऊरच्या सरपंचाकडून एकास जिवे मारण्याची धमकी

नाऊरच्या सरपंचाकडून एकास जिवे मारण्याची धमकी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील नाऊर येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला कडू पाणी येते ते पिवून पहा, असे म्हटल्याचा राग आल्याने नाऊर ग्रामपंचातीचे सरपंच सोन्याबापू गोविंद शिंदे यांनी एकास शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नाऊर येथील आप्पासाहेब वेणूनाथ राशिनकर हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जावून सरपंच सोन्याबापू गोविंद शिंदे यांना म्हणाले की, पिण्याच्या पाण्याच्या नळाला कडू पाणी येत आहे. तुम्ही ते कडू पाणी पिवून पहा. याचा सरपंच सोन्याबापू शिंदे यांना राग येवून त्यांनी आप्पासाहेब राशिनकर यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली तसेच तुला मारुन टाकीन, अशी जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आप्पासाहेब वेणूनाथ राशिनकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी सरपंच सोन्याबापू शिंदे यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा रजि. नं. 505/2022 प्रमाणे भादंवि कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लोंढे हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या