Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारजामतलाव येथे ताज्या तोडीचे सागवानी लाकूड जप्त

जामतलाव येथे ताज्या तोडीचे सागवानी लाकूड जप्त

नवापूर – Navapur – श.प्र. :

तालुक्यातील जामतलाव येथे वनविभागाने एका घरातून ताज्या तोडीचे सागवानी लाकूड तसेच रंधा मशिन, वाहनांसह इतर सुमारे 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध वनगुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आज रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास वनरक्षक बोरझर यांच्याकडील प्रथम रिपोर्टनुसार फरार वाहन अवैध मुद्देमाल तसेच रंधा मशिन मशिन जप्तबाबत व आरोपी इसम परेश सुरेश गावीत रा.जामतलाव यास अटक करण्यासाठी जामतलाव येथे शासकीय वाहनाने सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांच्यासमवेत नंदुरबार वनविभागामधील वनक्षेत्र नवापूर चिंचपाडा, खांडबारा, शहादा, नंदुरबार, काकडदा, मोबाईल स्कॉड शहादा, तसेच धुळे वनविभाग मधील वनक्षेत्र कोंडाईबारी, पिंपळनेर मधील सर्व वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासह जामतलाव येथे जाऊन आरोपीच्या घराची व परिसराची झडती घेतली असता आरोपी फरार होता.

मात्र घरात रंधा मशिन, डिझाईन मशिन, पाया उतार मशिन, डिझेल इंजिन मशिन व ताज्या तोडीचे साग चौपाट नग सहा मिळाले. तसेच घराच्या दोन्ही बाजूस फरार असलेले टीयुव्ही 300 लाल रंगाची महिंद्रा कंपनीचे वाहन क्रमांक (एमएच 39 जे 8772) व टाटासुमो पांढर्‍या रंगाची क्रमांक जीजे 16 डब्ल्यू 3938 ही वाहने आढळून आली.

सदर वाहन मुद्देमाल व यंत्र सामुग्रीसह नवापूर येथील पोलीस निरीक्षक राजपूत व त्यांच्या स्टाफच्या मदतीने जप्त करून क्रेन मशिन च्या सहाय्याने व शासकीय वाहनाच्या साहाय्याने वहातूक करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे वनपाल आगार यांच्या ताब्यात जमा करण्यात आले.

सदर जप्त वाहन व मुद्देमालाची किंमत अंदाजे 12 लक्ष आहे. याबाबत वनक्षेत्रपाल नवापूर यांनी त्यांच्याकडील अहवालानुसार आरोपींविरुद्ध वनगुन्ह्याची नोंद केली आहे.

सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार तसेच पोलीस विभाग नवापूर तसेच नंदुरबार वनविभाग व धुळे वनविभाग येथील वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक तसेच मोबाईल स्कॉड शहादा यांनी केली.

पुढील कारवाई वनसंरक्षक धुळे वनवृत्त धुळे, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, विभागीय वनाधिकारी दक्षता पथक, धुळे व सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नवापूर व रेंज स्टाफ नवापूर करित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या