Saturday, October 10, 2026
Homeदेश विदेशयुद्धगुन्हे, मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या नवी पिल्लई यांना शांततेचा नोबेल जाहीर; कोण आहे...

युद्धगुन्हे, मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या नवी पिल्लई यांना शांततेचा नोबेल जाहीर; कोण आहे नवी पिल्लई?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ न्यायाधीश आणि मानवी हक्क कार्यकर्त्या नवनेथम ‘नवी’ पिल्लई यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायदा मजबूत करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि युद्धगुन्हे, मानवतेविरुद्धचे गुन्हे तसेच नरसंहारासाठी जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. नॉर्वेजियन नोबेल समितीने ९ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराची घोषणा केली.

कोण आहेत नवी पिल्लई?
नवनेथम पिल्लई यांचा जन्म १९४१ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे भारतीय तमिळ वंशाच्या कुटुंबात झाला. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाची व्यवस्था अस्तित्वात असताना त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात वाटचाल सुरू केली. वर्णभेद आणि भेदभावाविरुद्ध न्यायालयीन लढा देताना त्यांनी मानवी हक्क, समानता आणि कायद्याचे राज्य या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवले.

- Advertisement -

त्यांच्या कारकिर्दीचा विशेष उल्लेख केला जातो तो म्हणजे त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या न्यायसंस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तपदीही त्यांनी काम केले.

2026 Nobel Peace Prize laureate Navi Pillay’s commitment to universal legal principles and her firm moral compass are constants in a long career. Born into a family of Indian Tamil origin under apartheid in Durban, South Africa, Pillay became a lawyer and legal pioneer, confronting deep structural discrimination, segregation and exclusion. A common thread runs from her early work defending Nelson Mandela and others who stood up against apartheid to her service as a judge in some of the key international court cases of our time.

This year’s laureate has significantly enlarged the scope and impact of international law. She has served as a judge on the High Court in South Africa, the International Criminal Tribunal for Rwanda and the International Criminal Court. She was the United Nations High Commissioner for Human Rights and, until recently, she chaired the UN Independent International Commission of Inquiry on the Occupied Palestinian Territory. Today Navi Pillay is a judge on the International Court of Justice in the case where Myanmar stands accused of genocide.

In historic international court cases, she has shown that legal measures can help prevent acts of war and violence. Navi Pillay has also contributed to strengthen the institutions of international law. Her independence, expertise and steadfastness have made her one of the most respected international jurists of our time.

Learn more about the 2026 #NobelPeacePrize: https://t.co/JMjpp1jPKc

#NobelPeacePrize #NobelPrize— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2026

रवांडा नरसंहार प्रकरणातील ऐतिहासिक योगदान
नवी पिल्लई यांनी रवांडासाठीच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणात न्यायाधीश म्हणून काम केले. या न्यायाधिकरणातील त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग म्हणजे लैंगिक हिंसा आणि बलात्कार यांना नरसंहाराच्या गुन्ह्याशी संबंधित ठरविणाऱ्या ऐतिहासिक न्यायनिर्णयांमध्ये बजावलेली भूमिका. या कामामुळे युद्ध आणि संघर्षांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांकडे आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेने पाहण्याच्या दृष्टिकोनाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.

शिवसेना पक्ष-धनुष्यबाणाचा फैसला ‘या’ तारखेला; सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष!

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तपदाची जबाबदारी
२००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून काम केले. या पदावर असताना जगभरातील मानवी हक्कांचे उल्लंघन, भेदभाव, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि दुर्बल घटकांच्या संरक्षणासारख्या विषयांवर त्यांनी भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय आणि इतर जागतिक न्यायसंस्थांमधील त्यांच्या अनुभवामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीला बळ देण्याच्या प्रयत्नांत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : गर्दीचा फायदा घेत चाेरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक-धुळे (Nashik-Dhule) इलेक्ट्रिक बसमध्ये बसताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत चाेरट्याने तब्बल १४ लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख...