Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNavratri 2025 : नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगी देवीमंदिर २४ तास राहणार खुले; सुमारे १५...

Navratri 2025 : नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगी देवीमंदिर २४ तास राहणार खुले; सुमारे १५ लाख भाविकांची शक्यता

नांदुरी | वार्ताहर | Nanduri

नवरात्रोत्स (Navratri) निमित्ताने आज (दि.२२) पासून सप्तशृंगी देवी मंदिर (Saptashrungi Devi Temple) २४ तास उघडे राहणार आहे. नवरात्रात सुमारे १५ लाख भाविक देवीच्या चरणी लीन होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्व नियोजन पूर्ण केले आहे. आज (सोमवारी) सकाळी ७ वाजता जिल्हा व सत्र न्यायालय प्रमुख अभय लाहोटी यांच्या हस्ते सप्तशृंगी देवीची पंचामृत महापूजा करून सकाळी साडेनऊ वाजता सप्तशृंगी मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

- Advertisement -

त्यानंतर मंगळवार दि.२३ ते दि.३० ऑक्टोबर पर्यंत रोज सकाळी ७ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते पंचामृत महापूजा होईल. मंगळवार दि.३० रोजी अष्टमीच्या दिवशी सकाळी ७ वाजता पालखी पूजन आणि नगरप्रदक्षिणा, बुधवार दि. १ रोजी नवमीच्या दिवशी शतचंडी याग होमहवन पूजा, करण्यात येवून दुपारी ३ वाजता दरेगावचे पारंपारिक मानकरी गवळी पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सप्तशृंग गावात कीर्ती ध्वजाची मिरवणूक काढून रात्री १२ वाजता सप्तशृंगी देवीच्या सप्तशृंग शिखरावर ध्वजारोहण करण्यात येईल.

दसऱ्याच्या (Dasara) निमित्ताने गुरुवार दि.२ रोजी शतचंडी याग पूर्णाहुती व महापूजा करण्यात येईल. सोमवार दि. ६ रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पंचामृत महापूजा करून विविध कावडी धारकांनी कावडीने आणले ल्या ठिकठिकाणच्या तीर्थाचा देवीला महाभिषेक व आरती रात्री ९ व १२ बाजता होईल, याशिवाय दि. ७ ब ८ रोजी शांतीपाठ व महाप्रसाद होईल अश्या पद्धतीने नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमेचे नियोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी साधारण १५ लाख भाविक येणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज असून त्या दृष्टीने उत्सवाची तयारी करण्यात आली आहे. यात्रा यशस्वीतेसाठी ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.

खाजगी वाहनांना बंदी

सप्तशृंगी गडावर (Saptshrung Gad) सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने. दि. २२ रोजी ते दि. ६ ऑक्टोबर पर्यंत सप्तशृंगीगड ते नांदुरी घाट रस्ता खाजगी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यादरम्यान फक्त बससेवा २४ तास सुरू राहणार आहे. भाविकांनी आपली खाजगी वाहने नांदुरी येथेच पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...