Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : "छोट्या राज्यात विरोधक, मोठ्या राज्यात…"; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतदानाची...

Sharad Pawar : “छोट्या राज्यात विरोधक, मोठ्या राज्यात…”; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतदानाची आकडेवारी देत शरद पवारांची महायुतीवर टीका

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) राज्यात तब्बल २३१ जागा जिंकत पूर्ण बहुमतात सरकार स्थापन केले आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवरच विजय मिळाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट मतदानाची आकडेवारी सादर करत मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त करून विरोधकांवर निशाणा साधला आहे.आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. तसेच उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

हे देखील वाचा : EVM वरून विरोधक कडाडणार; शरद पवार आणि राहुल गांधी उद्या मारकडवाडीला जाणार

यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते. पण मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. पण मी उगीचच आरोप करणार नाही. कारण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. पण काही माहिती समोर आली आहे. त्यावरून आश्चर्य वाटत आहे, एकूण मतं किती पडली आणि उमेदवार किती निवडून आले. आता काँग्रेसला महाराष्ट्रात ८० लाख मतं आहे. १५ उमेदवार विजयी झाली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ७९ लाख मतं मिळाली. काँग्रेस पेक्षा एक लाख कमी मतं मिळाली. पण त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहे. म्हणजे जिथे काँग्रेसचे ८० लाख त्यांचे १५ उमेदवार आणि ज्यांचे ७९ लाख उमेदवार आहे त्यांचे ५७ उमेदवार निवडून आले आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच आमच्या पक्षाला ७२ लाख मतं आहेत मात्र,आमचे फक्त १० उमेदवार निवडून आले आहेत.तर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५८ लाखं मत मिळाली असून त्यांचे ४१ उमेदवार विजयी झाले आहेत.त्यामुळे हा मोठा फरक दिसत आहे. आम्ही काही खोलात गेलो नाही, प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली, याबद्दल अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत भाष्य करणार नाही. पण मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहे, अशी आकडेवारीही शरद पवार यांनी मांडली.

हे देखील वाचा : मविआला मोठा धक्का! विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असतानाही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आज मी विधानसभेतून (Vidhansabha) थोडी माहिती घेतली, त्यांचे म्हणणे एकच होते की लोकसभेच्या निवडणुकीवेळी ईव्हीएमची तक्रार नव्हती. मग तुम्ही आताच कशी करता? पण आमचे निरीक्षण असे आहे की, चार निवडणुका झाल्या. हरियाणात झाली, मी स्वत:तिथे गेलो होतो. तिथे भाजपची अवस्था कठीण होती. पण भाजप सत्तेवर आली. पण त्याचवेळी जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला आले. महाराष्ट्रात भाजपला यश आलं. त्याचवेळी झारखंडला भाजपचा पराभव झाला. याचा अर्थ छोटी राज्य तिथे आम्ही आणि जिथे मोठी राज्य तिथे भाजप असे दिसते, असेही त्यांनी म्हटले. तसेच उद्या मी मारकडवाडीमध्ये जात आहे. तिथल्या लोकांशी मी बोलणार आहे. तिथल्या दोन्ही उमेदवारांची मत पाहिली. जानकरांची सभा पाहिली, त्यामुळे निकाल काय लागणार याचा अंदाज होता. एवढंच नाहीतर इचलकंरजीमध्येही सभा पाहिली तिथेही निकाल काय लागणार याचा अंदाज होता. पण मतमोजणीतून अपेक्षित निकाल लागला नाही. याची कारणमीमांसा लगेच करता येणार नाही, अधिकृत आकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. माझ्याकडे अधिकृत आकडे नाही, जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी येत नाही, तोपर्यंत मी ईव्हीएम मशीनवर असा कोणताही आरोप केला नाही. पण जी आकडेवारी आहे त्याबद्दल माहिती दिली आहे, असेही पवार यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...