Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांना केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शंका; म्हणाले…

शरद पवारांना केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शंका; म्हणाले…

मुंबई । Mumbai

येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका (Maharastra Assembly Election) होणार आहेत. त्यापूर्वीच केंद्र सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP SP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना झेड प्लस (Z+) सुरक्षा दिली आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्रालयाने (Central Govt) पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) निर्देश दिले आहेत. या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या ५५ सशस्त्र कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान, शरद पवारांनी मात्र Z+ सुरक्षेवर शंका उपस्थित केली आहे. मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेंटीक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

हे हि वाचा : गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट! ९ जणांसह जनावरे होरपळली

देशात तीन लोकांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच्यात एक मला, आणि दुसरी आरएसएस चे भागवत आणि देशाचे गृहमंत्री यांचही नाव आहे. आता ही सुरक्षा कशासाठी दिली याची माहिती नाही. पण कदाचित निवडणुका आहेत यावेळी ऑथेंटीक माहिती मिळवण्याची व्यवस्थाही असू शकते, नक्की काय आहे मला माहिती नाही, असंही खासदार शरद पवार म्हणाले. होममिनिस्ट्री आहे त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. याची माहिती घेणार असून त्याच पुढ काय करायचं ते ठरवणार आहे, असंही पवार म्हणाले.

हे हि वाचा : मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांच्या चुकांवर ठेवले बोट; सरकारवर ही ओढले ताशेरे

दरम्यान, शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय झाल्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करत टीका केली होती. त्यांच्या पोस्टची बरीच चर्चाही झाली. “शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, ५५ सीआरपीएफ त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे??. बातमी वाचली आणि वाटलं की ५० वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय??” असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या