Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याचर्चा तर होणारच! फडणवीसांनंतर एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

चर्चा तर होणारच! फडणवीसांनंतर एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर आता एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांनी ही भेट सदिच्छा असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस केली अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे सुद्धा उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ही भेट झाल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

हे तर्कवितर्क सुरू असतानाच मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठा पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या