Friday, May 3, 2024
Homeराजकीयनाशिक पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीची भूमिका काय? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

नाशिक पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीची भूमिका काय? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

नाशिक | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) दिवसेंदिवस नवीन घडामोडी घडत आहेत. मतदानाला अवघे १३ दिवस बाकी असतांना महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) एकत्रित भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीकडून डॉ. सुधीर तांबेंना (Dr.Sudhir Tambe) उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ.तांबेंनी त्यांच्याऐवजी पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचा अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी देखील नाशिक पदवीधरसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्री गाठत ठाकरे गटाचा (Thackeray group) पाठिंबा मिळवला. यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असणार याविषीय तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यावर आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघ गोंधळाविषयी अंतिम निर्णय उद्या होईल. नाशिकबाबत महाविकास आघाडीची  बैठक अद्याप झालेली नाही.आमची फोनवर चर्चा सुरू असून नाशिकचा प्रश्न हा काँग्रेस अतंर्गत आहे. त्यामुळे उगीच त्यात महाविकास आघाडीला गोवले जाऊ नये., असे अजित पवारांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काही नेत्यांशी चर्चा केली आहे.त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत आमची चर्चा सुरू असून काँग्रेसची भूमिका पाहून राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल. असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या