Monday, August 17, 2026
HomeनगरShrigonda : 2.60 कोटींची फसवणूक; राष्ट्रवादीचे नाहाटा ताब्यात

Shrigonda : 2.60 कोटींची फसवणूक; राष्ट्रवादीचे नाहाटा ताब्यात

शासकीय योजना व जमीन विकासाच्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनिअरसह नातेवाईकांना गंडा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

शासकीय योजना व जमीन विकास व्यवसायात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअरसह त्यांच्या नातेवाईकांची 2 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी नेते प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहाटा यांना पुणे पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. याप्रकरणी अजय श्यामकांत चौधरी आणि प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहाटा यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

वाकड येथील रहिवासी राहुल रामराजे मकेदार (वय 43, सॉफ्टवेअर इंजिनिअर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये मकेदार यांची अजय चौधरी (संचालक, गजनिया शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड) यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर चौधरी व नाहाटा यांनी मॅग्रेट (महाराष्ट्र ग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट) ही महाराष्ट्र शासनाची योजना असल्याचे सांगून गुंतवणुकीचे आमिष दाखवले. नाहाटा यांनी आपण महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सदस्य असल्याचे सांगून योजनेत धोका नसल्याचे भासवले.

20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 78 दिवसांत 60 लाख रुपये परतावा मिळेल, असे सांगून मकेदार, त्यांची पत्नी, बहिणी व सासरे यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. अधिक परताव्याचे आमिष दाखवून घरातील सोने-चांदीचे दागिने विकण्यासही भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच पाचगाव (हॅरिसन फॅमिली) येथील जमीन विकसित करण्याच्या नावाखाली अजय चौधरी यांनी मकेदार यांच्याकडून 1 कोटी 60 लाख रुपये ऑनलाइन व रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे शासकीय योजनेच्या नावाखाली 1 कोटी व जमीन विकासाच्या नावाखाली 1 कोटी 60 लाख, अशा एकूण 2 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांना ताब्यात घेण्यात आले.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...