Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : राजकारणातील सर्व पुतण्यांचा DNA सारखाच; छगन भुजबळांचा रोख कुणाकडे?

Chhagan Bhujbal : राजकारणातील सर्व पुतण्यांचा DNA सारखाच; छगन भुजबळांचा रोख कुणाकडे?

मुंबई । Mumbai

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरु आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळांचे एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणावर? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना, काका-पुतण्याच्या संघर्षावर फार मोकळेपणाने भाष्य केलं आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्याबद्दल प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे असं आता वाटायला लागलं आहे. पुतणे काकांचं ऐकत नाही, असं वाटत आहे. राज्यात हा संघर्ष खूप पाहायला मिळालाय असं म्हणत शरद पवार यांचे पुतणे, अजित पवार यांचे पुतणे, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे अशी यादीच भुजबळ यांनी यावेळी वाचली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांच्या घरात बंडखोरी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. छगन भुजबळांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

समीर भुजबळ हे आता सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगावमध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला. समीर भुजबळ हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे नांदगावमधील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या