Sunday, November 8, 2026
Homeमुख्य बातम्याNCP Politics : खासदार पार्थ पवार सलग दुसऱ्या दिवशी 'सिल्वर ओक'वर शरद...

NCP Politics : खासदार पार्थ पवार सलग दुसऱ्या दिवशी ‘सिल्वर ओक’वर शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी (ता. ७) संध्याकाळी खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन शरद पवारांची तब्बल दीड ते दोन तास भेट घेतली.

- Advertisement -

विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. त्यानंतर आज (रविवारी, ता. ८) दिवाळीच्या (Diwali) पहिल्या दिवशी पुन्हा एकदा पार्थ पवार ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात विलिनि‍करणाच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे.

‘१० तारखेनंतर बोलू’ विधानामुळे चर्चांना सुरुवात

शरद पवार रुग्णालयात (Hospital) दाखल असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी पवार आणि पटेल यांच्यात झालेल्या संभाषणात “१० तारखेनंतर बोलू,” असे वाक्य बाहेर आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. तथापि शरद पवार यांच्या पक्षाकडून या सर्व अफवा असल्याचे सांगितले जात असले, तरी पार्थ पवारांच्या सलग दोन दिवसांच्या भेटींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. पवार आजारी असल्यामुळे ही कौटुंबिक भेट होती की यामागे काही राजकीय कारण आहे, याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

उन्मेष पाटील काय म्हणाले?

या विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, “विलीनीकरण करायचं म्हणजे तुतारी पक्ष घड्याळसोबत येऊन एकत्रित राष्ट्रवादी करायची, मग मोदींचं नेतृत्व त्यांना मान्य होतं का? आज मान्य असेल तर मग फुटीची काही गरजच नव्हती”, असे त्यांनी म्हटले.

राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया काय?

दुसरीकडे, यावर प्रतिक्रिया देताना राजेंद्र पवार (Rajendra Pawar) म्हणाले की, “विलीनीकरणाबाबत मला फारशी माहिती नाही. जर विलिनीकरण ठरले असेल, तर १० तारखेला या गोष्टी स्पष्ट होतील आणि पक्षाचे प्रमुखच त्याबद्दल सविस्तर बोलतील, ” असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Pathardi : भगवानगडाच्या पायथ्याशी विहिरीत आढळले आठ दुचाकीचे सांगाडे

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या (Bhagwangad) पायथ्याशी घोगस पारगाव रस्त्यालगत असलेल्या जुन्या विहिरीमध्ये (Well) तब्बल आठ दुचाकीचे सांगाडे व अवशेष आढळून आल्याने...