Friday, April 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय; पक्ष वाढीसाठी सुनेत्रा पवारांचे पार्थ, जय...

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय; पक्ष वाढीसाठी सुनेत्रा पवारांचे पार्थ, जय पवारांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप

पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबाने आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पक्षाची धुरा आणि राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी कुटुंबात जबाबदाऱ्यांचे औपचारिक वाटप निश्चित करण्यात आले असून, आगामी काळात राष्ट्रवादीची वाटचाल तीन मुख्य पातळ्यांवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनेत्रा पवार राज्यात आल्याने रिक्त झालेल्या खासदारकपदी पार्थ पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचाही शपथविधी पार पडला. दरम्यान आता पवार कुटुंबात जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे राज्याची महत्त्वाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

- Advertisement -

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी एकच जागा, पण सहा जणांमध्ये रस्सीखेच, सुनेत्रा पवार कोणाची निवड करणार?

कोणावर कोणती जबाबदारी
सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तीन टप्प्या वाटप केल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार आता पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभरात फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहणार आहेत. पार्थ पवार यांच्याकडे मुंबई, पुण्यासह दिल्लीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे तर जय पवारांकडे बारामती, बीडसह ग्रामीण भागाची जबाबदारी दिल्याची माहिती आहे. पक्षातील संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अंतिम निर्णय मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून ही जबाबदारी दिली असल्याची माहिती आहे.

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवारांना बाजुला सारून काही नेत्यांना पक्षाची सूत्रे आपल्या ताब्यात घ्यायचे असल्याचे आरोप केले जात आहेत. अशातच आता पक्षावर आपली पकड मजबूत रहावी यासाठी राष्ट्रवादीची सर्व सूत्रे आपल्या कुटुंबाच्याच हातात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बोलण्याच्या ओघात कदाचित बोलून गेला असेल
जय पवार यांच्या विधानावर श्रीनिवास पवार यांनी भाष्य केले होते. “जय पवार बोलण्याच्या ओघात कदाचित बोलून गेला असेलही, पण बारामतीतून 2029 साली नेमकं कोण लढणार याचा निर्णय अंतिम निर्णय हा आमच्या पक्षाकडून पवार साहेब आणि त्यांच्या पक्षाकडून सुनेत्रा वहिनीच घेतील,” असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या