Wednesday, February 19, 2025
Homeनगरशरद पवार गटाच्या यादीत तनपुरे, पवार, वर्पे, ढाकणे, लंके यांचा समावेश तर...

शरद पवार गटाच्या यादीत तनपुरे, पवार, वर्पे, ढाकणे, लंके यांचा समावेश तर काँग्रेसची आ. थोरात, घोगरे यांना उमेदवारी

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधत काल उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश असून पक्षाने काही नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे तर कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहीत पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर कोपरगाव मतदारसंघासाठी संदीप वर्पे, शेवगाव मतरदारसंघात प्रताप ढाकणे तर पारनेरमध्ये राणी लंके यांना नव्याने संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसची बाळासाहेब थोरात, प्रभावती घोगरे यांना उमेदवारी

  • मुंबई | Mumbai – विधानसभा निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस पक्षाने आपली 48 जणांची पहिली यादी जाहीर केली. महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांची यादी जाहीर केल्यानंतर अखेर काल सर्वात शेवटी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकीत काँग्रेसने अनेक दिग्गज नेत्यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिली आहे. तर शिर्डी मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना यापूर्वीच भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे.
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या