Thursday, May 2, 2024
Homeनाशिक'५० खोके महागाई एकदम ओके'...; राष्ट्रवादी आक्रमक

‘५० खोके महागाई एकदम ओके’…; राष्ट्रवादी आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वाढत्या महागाई विरोधात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्या सुचनेनुसार प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadalag) व शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांच्या नेतृत्वात युवक राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन (Agitation) करण्यात आले…

- Advertisement -

यावेळी “५० खोके महागाई एकदम ओके!”, “जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गुवाहाटी..!”, “महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी..!” , “महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके… ५० खोके..!” “ बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार..!” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

देशातील वाढती महागाई (Inflation) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) सर्वसमान्य जनतेवर आर्थिक भार देऊन रुग्णालय सेवा, शिक्षण यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी (GST) लावत आहे.

तसेच मध्यवर्ती बँकेकडून सुद्धा व्याजदर वाढविले जात आहे. यामुळे जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील बनले आहे. केंद्र व राज्य सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यावर विविध केंद्रीय संस्थांमार्फत अडकविले जात आहे. त्यामुळे देशात हुकुमशाही होत असल्याचा आरोप करत युवक राष्ट्रवादीने महागाई विरोधात आंदोलन केले.

दोन महिन्यापासुन सरकार अस्तित्वात आले परंतु फोटोसेशन व्यतीरीक्त कुठलाही ठोस निर्णय मोदी सरकार व राज्य सरकार घेवु शकले नाही व महागाई,बेरोजगारी तसेच पावसामुळे पिंकाचे झालेले नुकसान हे विषय देशांतील सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे असुन त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेताना सरकार दिसत नाही.

फक्त व्यक्तीद्वेशाचे राजकारण करत व जिथे सत्ता नसेल तिथे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत ब्लेकमेल करून सत्ता हस्तगत करणे या कामात व्यस्त असताना केंद्राचे नेते दिसतात मग त्यात महाराष्ट्रात सत्ता हस्तगत करताना ५० खोक्याची चर्चा आज राज्य आणि देशभरात चालू आहे.

अमेरिका, चीन हे विकसित देश असून भारत हा विकसनशील देश आहे. त्यामुळे भारतात महागाई निश्चित जास्त राहणार हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना एसी रूम मधून काय कळणार, महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरली असून केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची पिळवणूक करत आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास खैरे यांनी दिली आहे.

यावेळी महेश भामरे, प्रदेश पदाधिकारी शादाब सय्यद,जय कोतवाल, गोटू आहेर, सागर बेदरकर, दत्ता वाघचौरे, विशाल डोखे, दिनेश धात्रक, राहुल कमानकर, गौरव ढोकणे, संतोष जगताप, कपिल भावले,डॉ.संदीप चव्हाण, अभिषेक शेवाळे, जाणू नवले, अक्षय भोसले, विक्रांत डहाळे, विक्रम जगताप, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे, किरण भुसारे, अक्षय पाटील, संदीप भेरे, रामेश्वर साबळे, संदीप गोतरणे,अक्षय पाळदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या