Friday, May 3, 2024
Homeनाशिकराष्ट्रवादीचे खड्ड्यात दिवे लावून आंदोलन

राष्ट्रवादीचे खड्ड्यात दिवे लावून आंदोलन

नाशिक | Nashik

नाशिक शहरातील विविध भागात खड्डे पडले असून महानगरपालिकेला त्याचा विसर पडला आहे.

- Advertisement -

सदर खड्ड्यांची आठवण व्हावी याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन करण्यात आले.

नाशिक शहरात पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांमध्ये रस्त्यांची कामे केल्याचा दावा नाशिक महानगरपालिकेने केल्यानंतर या रस्त्यांवर मोठे खड्डे असल्याचे नाशिककरांना दिसत आहे. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे वाहनधारकांना अनुभवास मिळत आहे.

तीन ते चार वर्षापासून नाशिक शहरातील खड्डे जशाच्या तसे असून या खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार रस्ते दुरुस्ती मध्ये होत आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच कॉलनी अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारकांना कंबरदुखी व अंगदुखीचा त्रास होत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा किरकोळ अपघात होत आहे. या प्रकरणावर सर्व स्तरातून विरोध होत असताना देखील नाशिक महापालिका सत्ताधाऱ्यांनी यावर काम केल्याचे दिसत नाही.

यासाठी नव्याने खड्ड्यांची आठवण व्हावी याकरिता शहरातील खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या