Sunday, July 7, 2024
Homeदेश विदेशNDA सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून 'यांची' वर्णी लागण्याची शक्यता

NDA सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून ‘यांची’ वर्णी लागण्याची शक्यता

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए आघाडीला २९२ जागांसह बहुमत मिळाले आहे. त्यामुळे देशातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. यानंतर आता नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच रविवार (दि.०९) रोजी सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र, एनडीए सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा असणार? महाराष्ट्रातून मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. त्यानंतर आता एनडीए सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला आणि महाराष्ट्रातून मंत्रिपदी कुणाला संधी मिळणार? याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएमध्ये (NDA) मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भाजपचे (BJP) १८ मंत्री असणार आहेत. तर घटक पक्षांना एकूण १८ मंत्रीपदे दिली जाणार आहेत. यामध्ये ७ कॅबिनेट आणि ११ राज्यमंत्रीपदांचा समावेश असेल. याशिवाय टीडीपी आणि जेडीयूला (TDP and JDU) प्रत्येकी दोन आणि शिवसेना, एनसीपी, एलजीपी, जेडीए, हम पार्टीला प्रत्येकी १ मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच महाराष्ट्रातून (Maharashtra) मोदींच्या मंत्रिमंडळात (Cabinet) भाजपला २ केंद्रीय मंत्री आणि २ राज्यमंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात खासदार नितीन गडकरी, पियूष गोयल, नारायण राणे, डॉ. हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे किंवा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांन संधी मिळण्याची शक्यता आहे.

मोदींच्या शपथविधीसाठी हे नेते राहणार उपस्थित

मोदींच्या शपथविधीसाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनुथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे हे उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या