श्रीरामपूर|प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील नेहरु भाजी मार्केट येथील टॉवरवरील घड्याळ दुरुस्तीसाठी भाजपचे संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. यावेळी नगरसेवक आशिष धनवटे, दीपक चव्हाण, रवी पाटील, श्रीनिवास बिहाणी, सिद्धार्थ फंड, मनोज लबडे, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ उपस्थित होते. यावेळी संजय छल्लारे म्हणाले, श्रीरामपूर शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले.
स्मारकासमोर असलेले हे घड्याळ बंद पडले. हिंदू समाजात बंद पडलेले घड्याळ हे अपशकुन मानले जाते. म्हणजे आता हे घड्याळ शहराच्या विकासासाठी अपशकुन ठरणार का ? या घड्याळासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, ही सुरुवात आहे. यापुढे शहराच्या जनतेच्या विविध भागांतील अनेक प्रश्नांसाठी आम्ही आवाज उठवत मोठी आंदोलने करणार आहोत. याची सत्ताधार्यांनी व पालिकेने सवय करून घ्यावी, असे रवी गुलाटी म्हणाले.
याप्रसंगी आशिष धनवटे, रुपेश हरकल, तिलक डुंगरवाल यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात तेजस बोरावके, भैय्या भिसे, संजय साळवे, विजय आखाडे, रवी पंडित, विशाल अंभोरे, बंडूकुमार शिंदे, रियाज पोपटिया, मिलिंद धीवर, सिद्धांत छल्लारे, राहुल पांढरे, दीपक कदम, सुजीत सुखदरे, विकास डेंगळे, कुंदनसिंह जुनी, अमन अलघ, शरद गवारे, विशाल पापडीवाल, अकिल पठाण, रोहित नाईक, उमेश छल्लारे, दत्ता करडे, रवी पंडित, विशाल आंभोरे, तेजस उंडे, गणेश छल्लारे, गोपाल अहिरराव, शिवा छल्लारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.





