Tuesday, January 6, 2026
HomeराजकीयNeil Somaiya : किरीट सोमय्यांचे मुलाचे टेन्शन वाढले, शिवेसना ठाकरे गटाने टाकला...

Neil Somaiya : किरीट सोमय्यांचे मुलाचे टेन्शन वाढले, शिवेसना ठाकरे गटाने टाकला मोठा डाव

मुंबई । Mumbai

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुलुंडचा वॉर्ड क्रमांक १०७ सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीला त्यांचा विजय सुकर मानला जात असतानाच, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने या जागेवर अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर करून सोमय्यांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

- Advertisement -

वॉर्ड क्रमांक १०७ ची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मिळाली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. यामुळे नील सोमय्या यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा रंगली होती. परंतु, शिवसेना ठाकरे गटाने अत्यंत चाणाक्षपणे पाऊल उचलत अपक्ष अर्ज भरलेले दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले. खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब केले.

YouTube video player

मैदानात उतरताच दिनेश जाधव यांनी नील सोमय्यांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. “नील सोमय्यांनी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अनेकांना दमदाटी केली आहे. त्यांना हा प्रभाग बिनविरोध जिंकायचा होता. अगदी काही गुजराती उमेदवारांनाही धमकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मला घाबरवण्याची हिंमत त्यांच्यात नाही. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असून अशा धमक्यांना भीक घालत नाही,” अशा जळजळीत शब्दांत जाधव यांनी नील सोमय्यांचे आव्हान स्वीकारले आहे.

दिनेश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुलुंडचा हा भाग मराठी बहुल आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली असली, तरी राजकीय परिस्थिती पाहता काहीतरी गडबड होणार याची त्यांना आधीच शंका होती. “निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करत आहे आणि सोमय्यांची जी दादागिरी सुरू आहे, त्या भीतीपोटी मी ३० तारखेलाच अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ठेवला होता. माझा अंदाज खरा ठरला आणि राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या ३०-३५ वर्षांपासून या भागात कार्यरत असलेले दिनेश जाधव यांनी आपल्या अनुभवावर विश्वास व्यक्त केला आहे. १० वर्षे शाखाप्रमुख आणि ८ वर्षे उपविभाग प्रमुख म्हणून काम केल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी मतदारांची एकजूट आणि हक्काच्या प्रतिनिधीसाठी जनता आपल्यालाच साथ देईल, असा ठाम विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे आता नील सोमय्या यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि संघर्षाची ठरणार आहे.

ताज्या बातम्या

सुरेश

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा...

0
पुणे | Puneकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी 2026) पुण्यातील वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने...