Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनेपाळमधील महापुरात महाराष्ट्रातील ८० नागरिक अडकल्याची माहिती, राज्य सरकारकडून हेल्पलाईन डेस्क जारी

नेपाळमधील महापुरात महाराष्ट्रातील ८० नागरिक अडकल्याची माहिती, राज्य सरकारकडून हेल्पलाईन डेस्क जारी

मुंबई | Mumbai
नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडाला आहे. विशेषतः रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे रस्ते, पूल, वाहने आणि अनेक ठिकाणची पायाभूत सुविधा वाहून गेली आहे. या आपत्तीत आत्तापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो पर्यटक बेपत्ता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ८० नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे आली आहे. मात्र, ही संख्या प्राथमिक असून नागरिकांची माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे.

महाराष्ट्रातील ८० नागरिकांचा समावेश
महाराष्ट्र राज्य आपत्कालीन संचालन केंद्राच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या ८० पेक्षा जास्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी ५७ जण रिचा टूर्स या ट्रॅव्हल एजन्सी तर्फे नेपाळला गेले होते, तर इतर नागरिक स्वतंत्रपणे प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे SEOC महाराष्ट्रकडून जिल्हानिहाय माहिती संकलन आणि पडताळणी सुरू करण्यात आली असून दुसरीकडे अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांशी आणि प्रवासी एजन्सीशी सातत्याने समन्वय साधण्यात येतोय. मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत करण्यात आल्याचीही माहिती आहे.

- Advertisement -

मात्र, वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळणाऱ्या माहितीत फरक असल्याने नागरिकांची अचूक संख्या आणि त्यांची सद्यस्थिती प्रशासनाकडून तपासली जात आहे. त्यामुळे ८० हा प्राथमिक आकडा असून तो अंतिम नसल्याचे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

‘सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र’; विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र सरकारचा २४ तास नियंत्रण कक्ष
महाराष्ट्रातील नागरिक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकारने मंत्रालयातील राज्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवला आहे. अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना माहिती मिळावी तसेच आवश्यक मदत आणि समन्वय साधता यावा यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्ष :
टोल फ्री हेल्पलाइन : १०७०
नियंत्रण कक्ष : +९१-९३२१५८७१४३
ई-मेल : controlroom@maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकृत माहितीनुसार राज्य आपत्कालीन संचालन केंद्र २४ तास कार्यरत आहे.

अडकलेल्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन
नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांशी संपर्क होत नसल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाइल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलची माहिती, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, बचावकार्य वेगाने सुरू असून नेपाळमधील परिस्थितीवर भारतीय यंत्रणांकडूनही लक्ष ठेवले जात आहे. संपर्क व्यवस्था आणि रस्ते मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार, नेपाळमधील स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय सुरू असून, नागरिकांची स्थिती स्पष्ट होताच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...