काठमांडू । Kathmandu
नेपाळमध्ये पुन्हा एका विमान अपघाताची घटना समोर आली आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले. (Kathmandu Plane Crash)
विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९ जण होते. या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली हे सध्यातरी समोर आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आज सकाळी ११ च्या सुमारास हे विमान टेक ऑफ दरम्यान कोसळले. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर ही दुर्घटना घडली. विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. विमानतळावर दूर वरून आगीचे लोळ दिसत होते.
हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर
काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९ जण होते. या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली हे सध्यातरी समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा