Friday, May 3, 2024
Homeनगरनवीन आरोग्यविषयक धोरणाला आयएमएचा विरोध

नवीन आरोग्यविषयक धोरणाला आयएमएचा विरोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवीन नर्सिंग होम कायद्याने (New Nursing Home Act) वैद्यकीय सेवा अडचणीत येणार आहे. शासनाच्या नवीन आरोग्यविषयक धोरणाचा आयएमएने (IMA) केला आहे.शासन दरबारी यासाठी दाद मागणार असल्याचा सूर नूतन कार्यकारिणीचा पदभार सोहळ्यात उमटला. दरम्यान, आयएमएच्या (IMA) नूतन कार्यकारिणीचा पदभार अध्यक्ष डॉ. मिलिंद पोळ व सचिव साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन पांडुळे यांनी स्वीकारला.

- Advertisement -

आयएमए भवन येथे सोहळा झाला. यावेळी इंडियन मेडिकल संघटनेचे (Indian Medical Association) राज्य सचिव डॉ. मंगेश पाटे, एमएमसी व सीडब्ल्यूसीचे मेंबर डॉ. निसार शेख, आयएमए महाराष्ट्र प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. रवींद्र कुटे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, माजी अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, माजी सचिव डॉ. सचिन वहाडणे, डॉ. सागर झावरे, डॉ. सुरेश रच्चा, डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. अमित करडे, डॉ. रामदास बांगर, डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ. दमन काशीद, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. गणेश बडे, डॉ. शैलेंद्र पाटणकर, डॉ. अक्षय्यदीप झावरे, डॉ. रोहित थोरात, डॉ. संदीप शिंदे, डॉ. अशोक नरवडे, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. रेणुका पाठक, डॉ. सारिका बांगर, डॉ. कृष्णा बलदवा, डॉ. सोनल बोरुडे, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. पाटे म्हणाले की, नवीन नर्सिंग होम कायद्याने वैद्यकीय सेवा महाग होऊन छोटे छोटे रुग्णालय चालविणे अशक्य होईल. 90टक्के रुग्णालये अटी शर्ती पूर्ण करू शकत नाहीत. पर्यायाने आरोग्यसेवा बंद करावी लागण्याची वेळ येऊ शकते. शासनाच्या नवीन आरोग्यविषयक धोरणाचा आयएमए विरोध करीत आहे. या धोरणाचा आम्ही निषेध करीत आहोत. शासन दरबारी यासाठी दाद मागणार आहोत, असे ते म्हणाले.

नूतन अध्यक्ष डॉ. मिलिंद पोळ म्हणाले की, आयएमएच्या माध्यमातून नियमितपणे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यापुढील काळातही हे उपक्रम सुरू राहतील. तळागाळापर्यंत आरोग्यसेवा पुरविण्याचे काम केले जाईल. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून डॉक्टरांना येणार्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

नूतन सचिव डॉ. सचिन पांडुळे म्हणाले की, आयएमच्या सर्व सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून 2 वर्षांच्या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील, असे सांगितले. यावेळी डॉ. निसार शेख, डॉ. सोनवणे, डॉ. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सोनल बोरुडे व डॉ. रेश्मा चेडे यांनी सूत्रसंचालन केले.

आयएमएची नूतन कार्यकाीरिणी अशी – अध्यक्ष डॉ. मिलिंद पोळ, सचिव डॉ. सचिन पांडुळे, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. सचिन वहाडणे, अतिरिक्त सचिव डॉ. अमित करडे, डॉ. रामदास बांगर, डॉ. प्राजक्ता पारधे, इतर पदाधिकारी डॉ. दमन काशीद, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. सोनल बोरुडे, डॉ. गणेश बडे, डॉ. शैलेंद्र पाटणकर, डॉ. अक्षय्यदीप झावरे, डॉ. राहुल पंडित, डॉ. रोहित थोरात, डॉ. संदीप शिंदे, डॉ. कृष्णा बदलवा, डॉ. सागर झावरे, डॉ. अशोक नरवडे, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. रेणुका पाठक, डॉ. सारिका बांगर.

- Advertisment -

ताज्या बातम्या