Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकाळजी घ्या, करोना वाढतोय! सक्रिय रुग्णसंख्या २३००० पार; नव्या रुग्णांमध्ये वाढ

काळजी घ्या, करोना वाढतोय! सक्रिय रुग्णसंख्या २३००० पार; नव्या रुग्णांमध्ये वाढ

दिल्ली | Delhi

गेल्या काही महिन्यांत करोना (corona) रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा करोनाने आपलं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही.

- Advertisement -

दिल्ली (Delhi), महाराष्ट्र (Maharashtra) नव्या करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांना अटक; Porn Star प्रकरण भोवलं

गेल्या २४ तासात देशात करोनानं ११ जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४ रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रामागोमाग चंदीगढ, दिल्ली, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पाँडिचेरी आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण

तसेच मागील २४ तासात देशात करोनाचे ४ हजार ४३५ नवे रुग्ण आढळून आले. तर, एकूण सक्रीय रुग्णसंख्या २३ हजार ९१ वर पोहोचली आहे. दिवसागणिक हा नव्या रूग्णांचा वाढता आकडा पाहून देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट वर आली आहे.

भटक्या कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात भीषण अपघात, थरारक Video कॅमेऱ्यात कैद

- Advertisment -

ताज्या बातम्या