Thursday, May 2, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात 43 गावांतून 96 संक्रमित

नेवासा तालुक्यात 43 गावांतून 96 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 43 गावांतून काल 96 संक्रमित आढळून आले. तालुक्यातील एकूण 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी सर्वाधिक 33 संक्रमित सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तर सर्वात कमी एक संक्रमित टोका प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यकक्षेत आढळून आला.

- Advertisement -

नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात नेवासा शहरात 11 तर तामसवाडीत तिघे असे 14 संक्रमित आढळले. नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील बेलपिंपळगाव, गोधेगाव व घोगरगाव या तीन गावांत प्रत्येकी दोन तर नेवासा बुद्रुकमध्ये एक असे 7 संक्रमित आढळले.

टोका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत भानसहिवरा येथे केवळ एक संक्रमित आढळला. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत 12 गावात 33 संक्रमित आढळले. त्यामध्ये सर्वाधिक 12 सोनईत, शिंगणापूर येथे 6, गणेशवाडी येथे 4, शिरेगाव येथे दोन तर खेडलेपरमानंद, मोरेचिंचोरे, पानसवाडी, पानेगाव, वंजारवाडी, वांजोळी व झापवाडी या 7 गावांत प्रत्येकी एक संक्रमित आढळला.

सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील दिघी येथे एक़ गळनिंब येथे 3 तर गोंडेगाव येथे 2 असे तीन गावांत 6 बाधित आढळले.कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील अंतरवाली, देडगाव, जेऊरहैबती, कुकाणा व सौंदाळा या पाच गावात प्रत्येकी दोघे तर भेंडा बुद्रुक व तरवडी येथे प्रत्येकी एकजण असे 7 गावांतून 12 संक्रमित आढळले. उस्थळदुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील तीन गावांत 5 बाधित आढळले. त्यात नारायणवाडी येथे तिघे तर रांजणगाव व वडाळा बहिरोबा येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील 9 गावात 16 बाधित आढळले. घोडेगाव येथे 5, महालक्ष्मीहिवरे येथे 3, चांद्यात दोघे तर बर्‍हाणपूर, कांगोणी, कौठा, माका, पाचुंदा व राजेगाव येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला. शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत पाथरवाला व वरखेड येथे प्रत्येकी एक असे दोघे संक्रमित आढळले. अशाप्रकारे तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील 43 गावांमधून 96 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 11 हजार 254 इतकी झाली आहे.

सोनई केंद्रांतर्गत सर्वाधिक 33 बाधित

तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी सोनई केंद्रांतर्गत 12 गावातून 33 बाधित आढळले. सर्वात कमी एक संक्रमित टोका केंद्रांतर्गत आढळला. नेवासा खुर्द (14), नेवासा बुद्रुक (7), सलाबतपूर (6), कुकाणा (12), उस्थळदुमाला (5), चांदा (16), शिरसगाव (2) असे अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बाधित आढळले.

- Advertisment -

ताज्या बातम्या