Friday, May 3, 2024
Homeनगरघोडेगावात कांद्याची 53 हजार गोण्या आवक

घोडेगावात कांद्याची 53 हजार गोण्या आवक

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी कांद्याच्या आवकेत सोमवारच्या तुलनेत 11 हजार 657 गोण्यांनी वाढ झाली. बुधवारच्या मार्केटसाठी 288 वाहनांमधून 53 हजार 336 गोण्या कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आला होता. भाव जास्तीत जास्त 4 हजारांपर्यंत निघाला. सोमवारच्या तुलनेत तो 200 रुपयांनी अधिक आहे.

- Advertisement -

उन्हाळी कांद्याच्या मोठ्या मालाला 3400 ते 3500 रुपये भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 3000 ते 3100 रुपये, मध्य मालाला 2100 ते 2500 रुपये, गोल्टी कांद्याला 1900 ते 2100 रुपये, गोल्टा कांद्याला 1900 ते 2500 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 500 ते 600 रुपये भाव मिळाला. एक-दोन वक्कलांना 3500 ते 4000 रुपये भाव मिळाला. नवीन मालाला 500 ते 3000 रुपये इतका भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या