Thursday, May 7, 2026
HomeनगरNewasa : नेवासा नगरपंचायतीसाठी शांततेत 78 टक्के मतदान

Newasa : नेवासा नगरपंचायतीसाठी शांततेत 78 टक्के मतदान

बोगस मतदान करताना एकजण ताब्यात

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा नगरपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेतत पार पडली. नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक अशा एकूण 18 जागांसाठी नेवासाकरांनी मतदान केले. एकूण 18 हजार 712 मतदारांपैकी 14 हजार 608 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती सरासरी 78.06 टक्के मतदान झाले.

- Advertisement -

थंडीमुळे सकाळी मतदारांचा उत्साह धिम्यागतीने होता. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी सकाळी मतदारच नव्हते. दुपारी मतदानाचा वेग वाढला. दुपारी 3 नंतर पुन्हा गर्दी वाढली. विशेष म्हणजे, मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर रांगा कायम होत्या. त्यामुळे प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान काही प्रभागात किरकोळ शाब्दिक चकमकीचे प्रकार झाले. याच बरोबर रात्री प्रभाग क्रमांक 13/1 मध्ये तरूणाला बोगस वोटिंग करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर कारवाई ची प्रक्रिया चालू होती.

शहरात नगराध्यक्ष पदासह सर्वत्र चुरशीच्या लढती झाल्या आहेत.शहरात प्रत्येक प्रभागात दावे प्रतिदावे केले जात असून काही ठिकाणी निकालावर मोठ्या रकमेच्या पैजा लागलेल्या आहेत. प्रभाग 12 व 13 मध्ये आदर्श मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. सर्वपक्षीय नेते दिवसभर नेवासा येथे ठाण मांडून होते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ दिसून आली.स्थानिक नेते व पदाधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित होते. मतदानाच्या शेवटच्या तासात गर्दी वाढली; रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होते.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काही केंद्रावर भेटी देत बंदोबस्ताचा आढावा घेतला. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार संजय बिरादार यांचे मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व ठिकाणी चांगला बंदोबस्त ठेवला होता.

आजचा आठवडे बाजार बंद
नेवासा नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी पार पडणार आहे. त्यामुळे नेवासा येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आदेश पारित केला आहे.

प्रभागनिहाय मतदान टक्केवारी
प्रभाग 1 – 668 (73.33टक्के)
प्रभाग 2 – 995 (80.69 टक्के)
प्रभाग 3 – 852 (78.53 टक्के)
प्रभाग 4 – 1115 (74.80 टक्के)
प्रभाग 5 – 863 (75.37 टक्के)
प्रभाग 6 – 629 (88.84 टक्के)
प्रभाग 7 – 1098 (75.20 टक्के)
प्रभाग 8 – 345 (79.68 टक्के)
प्रभाग 9 – 1055 (75.14टक्के)
प्रभाग 10 -846 (77.26टक्के)
प्रभाग 11 – 809 (77.19टक्के)
प्रभाग 12 – 807 (75.42 टक्के)
प्रभाग 13 – 975 (81.18 टक्के)
प्रभाग 14 – 1067 (85.22 टक्के)
प्रभाग 15 – 837 (76.50 टक्के)
प्रभाग 16 – 741 (78.25 टक्के)
प्रभाग 17 – 906 (79.68 टक्के)

एकूण – 14,608 (78.06 टक्के)

ताज्या बातम्या

Bribery News : जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचारी लाचलुचपत जाळ्यात

0
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जामखेड नगरपरिषदेतील दोन लोकसेवकांवर जन्म दाखल्यासाठी तीन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी बुधवारी (दि.6) कारवाई केली आहे. अभिजीत जालिम भैसडे (वय...