Tuesday, September 29, 2026
HomeनगरNewasa News : नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात?

Newasa News : नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात?

पाचेगाव फाटा (वार्ताहर)

नेवासा-श्रीरामपूर मुख्य रस्त्यावर बेलपिंपळगाव गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेल अजिंठा समोर एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृत्यू अपघाती आहे की घातपात, याबाबत अजूनही निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisement -

पाचेगाव फाटा येथून मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गावचा रहिवासी संजय मोहन पवार (वय अंदाजे ३२ वर्षे) हा सोमवारी (दि. २८ जुलै २०२५) रात्रीच्या सुमारास बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळून आला. हॉटेल अजिंठाच्या समोर ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सकाळी (२९ जुलै) हॉटेल अजिंठाचे कर्मचारी कामावर आल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आजूबाजूचा परिसर कसून तपासला. मृतदेह पाहता, तो काही तासांपूर्वीच मृत झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे मृत्यू सोमवारी रात्रीच झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संजय पवार याचा मृत्यू अपघातात झाला की कोणीतरी जाणूनबुजून घातपात केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी नेवासा फाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलपिंपळगाव येथील बिट हवालदार किरण पवार करत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे चिंता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...