Saturday, September 26, 2026
Homeक्राईमCrime News : नेवासा तालुक्यातील चार जुगार्‍यांना पकडले

Crime News : नेवासा तालुक्यातील चार जुगार्‍यांना पकडले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मांजरसुंबा (ता. अहिल्यानगर) गावाच्या शिवारातील गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या सोरट जुगारावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून नेवासा तालुक्यातील चौघांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी 3 हजार 870 रूपये रोख रक्कम तसेच सोरट जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (22 ऑगस्ट) दुपारी सव्वादोनच्या सुमारास मांजरसुंबा गावाच्या शिवारातील गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याशी डांबरी रस्त्याच्या कडेला काही जण विनापरवाना सोरट जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली असता चौघे जण सोरट जुगार खेळताना रंगेहाथ आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

संतोष साहेबराव ईरले (वय 40, रा. गंगानगर, नेवासा), अमोल बापू क्षिरसागर (वय 27, रा. वरखेड, ता. नेवासा), बबलू सदाशिव देवढे (वय 47, रा. लक्ष्मीनगर, नेवासा) आणि राजू छोटू ईनामदार (वय 49, रा. जुने कोर्ट, नेवासा) अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 हजार 870 रूपये रोख जप्त केली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : पीक कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफीसह सर्व सवलती लागू;...

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर...