Monday, November 30, 2026
HomeनाशिकNashik Crime News : तांदळाच्या कोठीत आढळली मेलेली पाल; FDA ची मोठी...

Nashik Crime News : तांदळाच्या कोठीत आढळली मेलेली पाल; FDA ची मोठी करवाई, थेट हॉटेलचा परवाना केला निलंबित

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या (Mumbai-Aagra Highway) समांतर रोडवरील चेतनानगर येथे असलेल्या कुकुम्बर हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणीत अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलच्या स्वयंपाकघरात तांदळाच्या (Rice) कोठीत मेलेली पाल आणि तांदळाच्या गोणीत उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ मांडणाऱ्या या हॉटेलचा परवाना एफडीएने निलंबित केला आहे.

- Advertisement -

अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गद्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी या हॉटेलची अचानक पाहणी केली. या तपासणीदरम्यान किचनमधील तांदळाच्या साठ्यात मेलेली पाल आढळली, तर तांदळाच्या गोणीत उंदराची विष्ठा सापडली. याशिवाय, हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ एकाच फ्रीजमध्ये कोणतीही विभागणी न करता साठवण्यात आले होते.

छताचे पापुद्रे निघत असलेले अस्वच्छ किचन, कर्मचाऱ्यांच्या अंगावर एप्रन, हँडग्लोव्हज आणि हेडगिअरचा अभाव, अशा दयनीय परिस्थितीत येथे अन्न शिजवले जात असल्याचे निष्पन्न झाले. वापरल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी, पेस्ट कंट्रोलचे अहवाल, कच्च्या मालाची बिले आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची कोणतीही आवश्यक कागदपत्रे हॉटेल प्रशासनाला सादर करता आली नाहीत.

​पुढील आदेशापर्यंत उत्पादन व विक्री बंद

तपासणी अधिकारी वैभव गद्रे यांचा अहवाल प्राप्त होताच, एफडीएचे पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त झा. सु. महाले यांनी २९ ऑक्टोबर रोजी पाऊल उचलले. त्यांनी (परवाना क्र. १११३०९२०००४८९) हॉटेलाचा परवाना निलंबित करण्याचे आदेश बजावले आहेत. जनआरोग्याच्या दृष्टीने हा गंभीर निष्काळजीपणा असल्याने पुढील आदेशापर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची निर्मिती आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अतिवृष्टीग्रस्त 1 हजार 792 विहिरींसाठी 2.61 कोटींचा निधी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2025-26 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या तसेच बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारच्या सरकारच्या मृद व जलसंधारण (रोहयो)...