Monday, November 2, 2026
Homeमुख्य बातम्याPolitical News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर, चर्चांना उधाण

नवी दिल्ली | New Delhi

विधानपरिषद निवडणुकीतील (Vidhan Parishad Election) पराभवानंतर आणि पक्षांतर्गत असंतोषाची ठिणगी पडलेली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वरिष्ठ नेत्यांनी रविवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित नव्हत्या. पक्षातील इतर नेत्यांनी शाह यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

- Advertisement -

कोण-कोण होते उपस्थित?

या महत्त्वाच्या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि माजी खासदार समीर भुजबळ हे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी रणनीती आणि पक्षांतर्गत विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा

या संपूर्ण घडामोडींमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे, उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित नव्हत्या. तसेच, पक्षाचे नेते पार्थ पवार यांनाही यापासून दूर ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली होती. त्यानंतर आता पक्षाच्या इतर बड्या नेत्यांनी त्यांना सोबत न घेता घेतलेली ही भेट राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारी ठरली असून, यामुळे पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पक्षांतर्गत मतभेद आणि उघड नाराजी

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने हक्काची पुणे पदवीधर जागा भाजपला सोडल्यामुळे पक्षात मोठी नाराजी निर्माण झाली होती. निकालामागून पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी जाहीरपणे पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. तर प्रवक्त्यांच्या नियुक्तीवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील आपल्याला माध्यमांमार्फत निर्णय समजल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पराभवानंतर नेत्यांकडून थेट नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून आत्मचिंतनाचा सल्ला दिला जात आहे.

ताज्या बातम्या

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; अर्णबनंतर ‘मुरासु’ चक्रीवादळाचा...

0
मुंबई | Mumbai ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील (Maharashtra) हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पुणे, अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार...