Friday, May 3, 2024
Homeराजकीयदुसर्‍या दिवशी 161 उमेदवारी अर्ज

दुसर्‍या दिवशी 161 उमेदवारी अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुसर्‍या दिवशी 161 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

पहिल्या दिवशी सहा अर्ज दाखल होते. यामुळे दोन दिवसांअखेर जिल्ह्यात 167 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हे शेवगाव तालुक्यात 28 तर राहाता आणि श्रीगोंंदा तालुक्यात प्रत्येकी एका अर्जाचा समावेश आहे.

जिल्ह्यात ऐन थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीचा जोश वाढताना दिसत आहे. दुसर्‍या दिवशी 161 उमेदवारी दाखल झाले असले तरी पुढील आठवड्यात सोमवार दि.28 पासून अर्ज दाखल करण्याचा वेग वाढणार आहे. यामुळे शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या संख्येने उमदेवारी अर्ज दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाला आहे.

दरम्यान, निवडणुका होणार्‍या गावातील राजकीय वातावरण टाईट झाले आहे. ऐन थंडीत निवडणुकांच्या ओल्या पार्ट्या सुरू झाल्या असून कोणा उमेदवारी मिळणार, कोण कोणाच्या विरोधात उभा राहणार, कोणाचे पारडे जड यावर आता खल सुरू झाली आहे.

दुसर्‍या दिवशी दाखल अर्ज

अकोले 11, संगमनेर 4, कोपरगाव 12, श्रीरामपूर 4, राहाता 1, राहुरी 3, नेवासा 17, नगर 26, पारनेर 8, पाथर्डी 13, शेवगाव 28, कर्जत 15, जामखेड 10 आणि श्रीगोंदा 1 यांचा समावेश आहे.

सुट्ट्यांच्या दिवशीही जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुरु राहणार

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कमी कालावधी राहिला असल्याने दि. 25, 26 व 27 डिसेंबर 2020 या शासकीय सुट्टयांचे दिवशी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. या सुट्टयांचे दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. या सुट्टयांचे दिवशी अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अ.मु.शेख, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नगर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या