Friday, May 3, 2024
Homeक्रीडासलग पाचव्या विजयासाठी पंजाब सज्ज

सलग पाचव्या विजयासाठी पंजाब सज्ज

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये आज सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे.

- Advertisement -

दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. पंजाबने आपले मागील ४ सामने जिंकल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आता कोलकातावर मात करून थेट चौथ्या स्थानावर छलांग मारण्यासाठी पंजाबचे किंग्ज सज्ज आहेत .

तर पंजाब संघाच्या खात्यात ११ सामन्यांमध्ये ५ विजय आणि ६ पराभवांसह १० गुण आहेत. विशेष म्हणजे पंजाब संघाचा नेट रनरेट कोलकाताच्या तुलनेत सरस आहे. त्यामुळे आजच्या सामन्याला क्वार्टर फायनलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार ? हे सांगणे कठीण आहे.

आता आजच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपला सातवा विजय संपादन करण्यासाठी कोलकाता सज्ज आहे. तर अबुधाबी येथे झालेल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पंजाबचे किंग्ज सज्ज आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे कोलकाता संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

आता पंजाबविरुद्ध विजय विजय मिळवून बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित करण्यासाठी कोलकाता सज्ज आहे. कोलकाता संघासाठी चिंतेची बाब म्हणजे दिनेश कार्तिक संघात मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करत आहे.

अबुधाबी येथे झालेल्या पंजाबविरुद्ध सामन्यांत ५८ धावांची खेळी करणाऱ्या कार्तिकला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. त्याला आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे. तर दुसरीकडे नितीश राणा , इऑन मॉर्गन , शुभमन गील चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे.

अष्टपैलू ग्लेन मॅक्स्वेलला अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे. शिवाय गोलंदाजीत मोहंमद शमी , मुरुगन अश्विन , रवी बिष्णोई , चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांना इतर गोलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या