Thursday, May 21, 2026
HomeनगरAkole : निळवंडे पाणी पेटणार; उजव्या कालव्यात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू

Akole : निळवंडे पाणी पेटणार; उजव्या कालव्यात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटणार आहे. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकरी व स्थानिक नागरिकांनी काल सोमवारी रात्रीपासूनच धामणगाव रोडवरील घोलप नजीक असणार्‍या कॅनॉलमध्ये बसून शेतकर्‍यांनी टाळ, मृदुंग, भजनाच्या साथीने आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची गरज शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

पाण्याचे योग्य वाटप, कालव्यांमध्ये वेळेवर पाणी सोडणे तसेच शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी आता या भागातील शेतकरी संतप्त झाले आहे. अभी नही तो कभी नही, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या डोळ्यासमोरून पाणी वाहत असताना आम्ही शांत का बसावे, धरणे बंधारे आमचे भागात लाभ मात्र खालच्या भागाला, पाण्यावर आमचा देखील हक्क आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला हक्काचे पाणी द्या, यासाठी काल सोमवारी सायंकाळी निळवंडेच्या उजव्या कालव्यात तंबू ठोकून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेतली न गेल्यास आंदोलनकर्ते शेतकरी कॅनॉल उद्ध्वस्त करतील. या पलीकडे जाऊन खाली पाणी जाऊ देणार नाहीत. प्रसंगी धरणाचे चाक देखील वेळप्रसंगी बंद करतील असा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते डॉ अजित नवले. शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते बाळासाहेब भोर, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानूदास तिकांडे, अगस्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष गणेश पापळ,अण्णा शेटे, माजी उपसरपंच अशोक देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी या कॅनॉलमध्ये उपोषणास बसले असून या ठिकाणी भजन व गायन करत शेतकरी भर उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. आंदोलनादरम्यान पाणी आमच्या हक्काचं आहे, कुणाच्या बापाचं नाही; आमचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे, असा ठाम इशारा संघर्ष समितीने दिला.

तसेच पालकमंत्र्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही करण्यात आली. यापूर्वी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला होता, मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धरण व बंधारे आमच्या तालुक्यात, शेती आमची; पण पाणी आमच्या डोळ्यासमोरून वाहून जाते आणि आम्हाला मिळत नाही. अजून किती बळी गेल्यावर आम्हाला न्याय मिळणार? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हाभरात औषधांची 8300 दुकाने बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ऑनलाईन फार्मसी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि औषध विक्रीतील अनियमित सवलतींना आळा घालण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला बुधवारी...