Thursday, May 2, 2024
Homeनाशिक‘निमा’च्या सुनावणीला पुन्हा एकदा 'तारीख'

‘निमा’च्या सुनावणीला पुन्हा एकदा ‘तारीख’

सातपूर । प्रतिनिधी Satpur

निमातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीला पुन्हा एकदा 16 ऑक्टोबरची तारीख मिळाली आहे

- Advertisement -

दोन्ही पक्षांनी काल सादर केलेल्या आपल्या जबाबावर परस्परांच्या हरकती असल्यास त्या 16 तारखेला दाखल करता येणार आहेत. त्यानंतरच्या तारखेला यावर निकाल दिला जाणार असल्याचे धर्मादाय उपायुक्त कांचनगंगा सुपाते जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

निमामध्ये सत्ता कोणाची या विवादावर दोन्ही पक्षांकडून न्यायालयाचे दार ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी धर्मदाय आयुक्तांकडे वर्ग केल्यानंतर 21 सप्टेंबरपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. अतिशय जवळच्या तारखा देण्यासोबतच दोन्ही पक्षांनी लिखित स्वरूपात आपला मत मांडण्याच्या सूचना धर्मदाय उपायुक्तांनी दिलेल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर दोन्ही वकिलांच्या वतीने भूमिका मांडण्यात आल्या. त्या परस्पर विरोधी गटांना देण्यात आलेल्या आहेत. यावर कोणाचे काही म्हणणे असेल तर त्यांनी 16 ऑक्टोबरच्या सुनावणीमध्ये दाखल करावयाचे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या