Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमहिनाभरात मनपातील ९ आरोग्यसेवकांचा करोनासह विविध आजाराने मृत्यू

महिनाभरात मनपातील ९ आरोग्यसेवकांचा करोनासह विविध आजाराने मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोनाचा वाढता संसर्ग रोकण्यासाठी मनपा प्रशासनाकडुन शर्थीचे प्रयत्न उपाय योजना केल्या जात असुन करोनाच्या कामात झोकुन काम करीत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर ताण तणावातून महिंनाभरात 9 सेवकांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक चर्चा समोर आली आहे…

- Advertisement -

यात रविवारी (दि.28) घन कचरा व्यवस्थापन विभागातील एका कर्मचार्‍यांचा मृत्यु झाल्यानंतर सेवकांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे. जादा काम व अपुर्ण सुविधा यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग वाढत जाऊन सध्या प्रति दिन नवीन करोना रुग्णांचा आकडा 2 हजाराच्या आसपास जाऊन पोहचला आहे. हा प्रादुर्भाव रोकण्यासाठी आता अधिकारी व कर्मचारी हे शर्थीने कामाला लागले आहे.

मनपा व खाजगी रुग्णालयांची तपासणी, करोना प्रतिबंधीत क्षेत्रात जाऊन तपासणी – सर्व्हेक्षण, कोविड सेंटर – रुग्णालय व्यवस्था कामांची पाहणी, आता विभागातील नियम न पाळणार्‍या दुकानदार व मास्क न वापरणार्‍यावर दंडात्मक कारवाई अशा कामांत अधिकारी व कर्मचारी गेल्या दोन महिन्यापासुन कामांस लागले आहे.

नियमित काम करुन जादा काम अधिकारी व कर्मचार्‍यांना करावे लागत आहे. या कामात काही सेवकांना करोनाची बाधी झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. तर या कामांच्या अति ताणामुळे अधिकारी व कर्मचारी आजारी पडत आहे.

अशा प्रकारातून हद्ययविकासासह इतर आजारांमुळे गेल्या दीड महिन्यात जवळपास आठ ते नऊ सेवकांचा मृत्यु झाल्याची चर्चा समोर आली आहे. काही दिवसापुर्वी नगररचना विभागातील लिपीक विराज मनोहर नांदुर्डीकर (वय 52 वर्ष) याचे अचानक मृत्यु झाला. यापुर्वी तांबोळी, देशमुख, देवरे यांच्यासह काही कर्मचार्‍यांचा मृत्यु झाला आहे. याप्रकारामुळे मनपा सेवकांत अस्वंस्थता निर्माण झाली आहे.

यातच रविवारी (दि.27) रोजी मनपा घन कचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ लिपीक दत्ता चौधरी (वय 43 वर्ष) यांचे करोनामुळे निधन झाल्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. चार दिवसापुर्वी करोनाची बाधा झाल्यानंतर चौधरी यांच्यावर बिटको रुग्णालयांत उपचार सुरू होते.

या मनपा कोविड रुग्णालयात व्हेंटीलेटर न मिळाल्यामुळे त्यांना चेतना हॉस्पिटल (पंचवटी कोविड सेंटर) येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा रविवारी मृत्यु झाला. त्यांच्याबरोबर पत्नी, आई व मुलगा अशांना देखील करोना बाधा झाली असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहे. चौधरी यांच्या मृत्युमुळे कर्मचार्‍यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुर्वी मनपाचे काही सेवकांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे.

या प्रकारानंतर आता कर्मचार्‍यांत असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे.

मनपा सेवकांना सुसज्ज रुग्णालय उभारावेत

करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी मनपा कर्मचारी व अधिकारी अगदी जीवावर उदार होऊन मोठ्या धाडसाने काम करीत आहे. दैनंदिन कामाबरोबर आता करोना संदर्भात थेट फिल्डवर काम करावे लागत आहे. सुरक्षासंदर्भात साहित्य वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना करोनाची बाधा होत आहे. सेवकांकडे चांगल्या उपचारासाठी पैसे नसल्याने मोठे कठी प्रसंग उभे राहत आहे. तेव्हा महापालिका प्रशासनाने शहर पोलीसांप्रमाणे आपल्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी व्हेंटीलेटर बेड व अत्याधुनिक उपचारांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी करावी अशी मागणी म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेना सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या