Wednesday, April 29, 2026
HomeनगरShrirampur : निफाडच्या बाबाने पत्नी व मुलीला आश्रमात ठेवून प्रपंच उद्ध्वस्त केला

Shrirampur : निफाडच्या बाबाने पत्नी व मुलीला आश्रमात ठेवून प्रपंच उद्ध्वस्त केला

परिसरातील अनेकांची आर्थिक लूट झाल्याची चर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आपल्याकडे दैवी शक्ती असून तुझ्या पत्नीच्या अंगातील भुताटकी, करणी दूर करतो, असे सांगून निफाड तालुक्यातील एका भोंदू बाबाने आपला प्रपंच उद्ध्वस्त केल्याची तक्रार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका व्यक्तीने केली आहे. तसेच बेलापूर परिसरातील अनेकांची या बाबाने आर्थिक फसवणूक केली असल्याची चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

बेलापूर येथील एका व्यक्तीने निफाड पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, निफाड तालुक्यातील एका गावातील भोंदू बाबाने माझा प्रपंच उद्ध्वस्त केला. त्यांनी म्हटले की, माझ्या पत्नीला मानसिक आजाराचा त्रास होत होता. तिला आम्ही वैद्यकीय अधिकार्‍याकडे दाखवले. परंतु काहींनी या बाबाकडे दैवी शक्ती आहे. तुम्ही तिला एकदा घेऊन या असे सांगितले. त्यामुळे माझे सासू-सासरे तिला घेऊन बाबाकडे गेले. बाबाने हिला करणी झालेली आहे. तिला काही दिवस आश्रमात ठेवावे लागेल असे सांगून आश्रमात ठेवून घेतले. त्याचबरोबर माझ्या पंधरा वर्षांच्या मुलीलाही आश्रमात ठेवून घेतले. मागील वर्षी मी पत्नी व मुलीला आणण्याकरता माझ्या मित्रासोबत गेलो असता बाबाचे व माझे तेथे वाद झाले. बाबाने मला दम दिला. माझ्याकडे मंत्र व दैवी शक्ती आहे. तू इथून गपचूप जा. नाहीतर तुझा खेळ खल्लास करून टाकेल असा दम दिल्यामुळे मी, माझ्या मित्रासोबत माझ्या मुलीलाही घेवून निघालो. परंतु बाबाने दम दिला. त्यामुळे मी मुलीला पुन्हा आश्रमात सोडले.

बाबा आपल्याला काहीही करू शकतो या भीतीने मी घाबरलो होतो. तशी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनलाही गेलो. परंतु माझी तक्रार घेण्यात आली नाही.
बाबा मला, माझ्या पत्नीला किंवा मुलीला काहीही करु शकतो ही भिती मला वाटत होती. परंतु नुकतेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबावर गुन्हा दाखल केला ही बाब मला समजताच बाबाला काहीही दैवी शक्ती प्राप्त नाही. त्याने माझ्या व माझ्या पत्नीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आमचा प्रपंच उद्ध्वस्त केल्याची खात्री झाली. या बाबाने माझ्या पत्नीच्या अज्ञानाचा फायदा घेतला व दैवी शक्तीची भिती दाखवून माझा प्रपंच उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे त्याला शिक्षा व्हावी व मला न्याय मिळावा, अशी मागणी या व्यक्तीने केली आहे. या भोंदुबाबाकडे बेलापुरातील काही भक्तगणही जात असल्याची व अनेकांची बाबाने आर्थिक लूट केल्याचीही चर्चा सुरु आहे. बाबाकडे जाणारे भक्तगण नेमके कोण याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

संतोष

Beed News: संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? धनंजय देशमुख म्हणाले,...

0
बीड | Beedबीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे मस्साजोग येथे पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि...