उगाव। वार्ताहर Ugaon
निफाड तालुक्यातील शेतीशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावात अद्ययावत वैद्यकिय सुविधा उभारल्या जात आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. शासनाच्या माध्यमातुन तालुक्यातील शेती, आरोग्य, रस्ते या पायाभुत सुविधा बळकट करणार असल्याचे लासलगाव बाजार समिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनप्रसंगी आमदार दिलीप बनकर यांनी असे प्रतिपादन शिवडी येथे केले.
शिवडी येथे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातुन 60 लाख रुपये निधीद्वारे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे उद्घाटन आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते शनिवार (दि.28) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते. व्यासपिठावर शिवडी सरपंच संगिता सांगळे, उपसरपंच नवनाथ शिंदे, सारोळे खुर्द सरपंच दत्तात्रय डुकरे, प्रभारी गटविकास अधिकारी सुनील पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुजित कोशीरे, माजी सरपंच अनिता शिरसाठ, तंटामुक्त समिती अध्यक्ष रंगनाथ दौंड, संजय गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा विविध संस्थांच्या वतीने क्षीरसागर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातुन मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी शिवडी ग्रामस्थ नेहमीच प्रत्येक निवडणुकीत स्थानिक मतभेद विसरुन खंबीरपणे पाठीशी राहिले आहेत. त्यामुळेच आपण विविध पदांवर कामकाज केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे कार्यकाळात शिवडी गावासाठी 60 लाख रुपये निधी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुर केल्याचे चीज झाल्याचे नमुद केले. याप्रसंगी शिवडी विकास सेवा संस्थेचे चेअरमन अॅड.रामनाथ शिंदे, बाजीराव ठाकरे, उपसरपंच नवनाथ शिंदे आदींनी मनोगतातून शिवडी गावातील राजकीय, सामाजिक वारसा व विकासात्मक विषयावर प्रकाश टाकला. विजय सानप यांनी सूत्रसंचालन तर नामदेवराव शिंदे यांनी आभार मानले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
कार्यक्रमास शिवडी माजी सरपंच बाळासाहेब क्षीरसागर, भगिरथ शिंदे, प्रमोद क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, दिलीप शिंदे, माजी चेअरमन कैलासराव क्षीरसागर, मुक्ताई पाणीवापर संस्था चेअरमन संजय शिंदे, बाबुराव सानप, माणिकराव क्षीरसागर, विलास मंडलिक, मधुकर क्षीरसागर, बाळासाहेब खापरे, बाजीराव क्षीरसागर, सुनिल गोसावी, भाऊसाहेब क्षीरसागर, बाळासाहेब सानप,
अरुण क्षीरसागर, वैभव क्षीरसागर, विनोद भुतडा, डॉ.कल्याण शिंदे, डॉ.संदिप शिंदे, शितल आवारे, संदिप क्षीरसागर, अरुण कातकाडे, भाऊसाहेब बोरसे, सोमनाथ शिंदे, बाळासाहेब क्षीरसागर, मधुकर क्षीरसागर, पांडुरंग कडवे, दगु नागरे, रामनाथ सांगळे, नितीन कापसे, सोमनाथ पडोळ, राजेंद्र निचित, विलास मत्सागर, भिमराव काळे, नानासाहेब खेलुकर आदींसह शिवडी ग्रामस्थ उपस्थित होते.
मुक्ताई पाणीवापर संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संजय शिंदे यांचा तर राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत शर्वरी कडवे हिने नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व केल्याबद्दल आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.