Wednesday, October 28, 2026
Homeक्राईमसोशल मीडियाची रील्स ठरली गुन्हेगारीची शाळा; इन्स्टाग्रामवर जुळले धागे, तळेगावात उघडकीस आला...

सोशल मीडियाची रील्स ठरली गुन्हेगारीची शाळा; इन्स्टाग्रामवर जुळले धागे, तळेगावात उघडकीस आला थरार

नाशिक | प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा विषय उरलेला नाही, तर तो तरुणाईला आणि गुन्हेगारी जगताला जोडणारा एक मोठा व्हर्चुअल मार्ग बनत चालला आहे. सोशल मीडियाचा वापर करून गुन्हेगारीचे जाळे कसे विणले जाऊ शकते, याचे एक खळबळजनक आणि डोळे उघडणारे प्रकरण नाशिकमध्ये समोर आले आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव येथील एका निर्मनुष्य बंगल्यात सुरू असलेल्या एका तथाकथित बनावट नोटांच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हा मामला केवळ नोटा छापाईचा नसून, एका अत्याधुनिक आणि चलाख सायबर गुन्हेगारी फसवणुकीचा असल्याचे तपासात उघड झाले आहे. या संपूर्ण रॅकेटमधील सर्व पाचही संशयितांची पहिली ओळख कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा ओळखीच्या माध्यमातून झालेली नाही, तर ती लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राममवर झाली. सोशल मीडियाच्या आभासी जगात झालेली ही ओळख नंतर प्रत्यक्षात एका मोठ्या गुन्हेगारी कटात बदलली. तेलंगणातील बनावट नोटांच्या गोरखधंद्यात हातशीला असलेले मास्टरमाइंड आणि नाशिकमधील स्थानिक संशयित एकत्र आले.

- Advertisement -

सिंहस्थाच्या स्मृती आता टपाल तिकिटांवर; रामकुंड, कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष ‘माय स्टॅम्प’चे शनिवारी अनावरण

या टोळीने १० लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तब्बल ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे अमिष दाखवून लोकांना प्लॅन लुटण्याचा आखला होता. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा आणि नाशिकच्या अमरेश्वर आईथा (वय ३७, रा. हैदराबाद, तेलंगणा), दासहरी सत्यइ (वय ३६, रा. सिरसिल्ला, तेलंगणा), गोकुळ दाते (वय ५६, रा. गंगापूर, नाशिक), हिरामण दाते (वय ५६, रा. तळेगाव, नाशिक)मच्छिंद्र घनदाट (रा.सातपूर, नाशिक) या संशयितांना गजाआड केले होते. विशेष म्हणजे प्रकरणातील थक्क करणारा खुलासा नाशिकचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी करुन या टोळीकडे नोटा छपाईसाठी लागणारी कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री, प्रिंटर किंवा उच्च दर्जाचे स्कॅनर्स सापडलेले नाहीत, असे स्पष्ट केले होते. नाशिक आणि परिसरातील नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला किंवा कमी वेळात पैशांचे आमिष दाखविणाऱ्या प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रत्यक्षात तिथे चालले काय होते ?
हा खरा प्रश्न पोलिसांसमोर होता. तपासात पुढे आले की, संशयित खऱ्या नोटांना एक विशिष्ट केमिकल लावून त्यावर शाई उमटवण्याचा बनाव करत असत. समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी ते खऱ्या नोटांवर प्रयोगाचा देखावा करत. म१० लाखांच्या खऱ्या नोटा आणा आणि ३० लाखांच्या बनावट नोटा घेऊन जा, फ अशी भुरळ पाडून, ग्राहकाकडून मूळ १० लाखांची रोकड हातात पडताच पोबारा करण्याचा हा अत्यंत चलाख कट होता.

आधी कोणाकोणाला लावला चुना?
या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता ग्रामीण पोलीस एका मोठ्या प्रश्नाचा शोध घेत आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकत्र आलेली ही हायटेक टोळी नाशिकमध्ये पकडल्या गेलेल्या या प्रकरणापूर्वी आणखी किती जणांना अशाच प्रकारे केमिकलचा थर आणि नोटांची जादू दाखवून गंडा घातला आहे? याचा सखोल तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठे बदल; झिशान सिद्दीकी, उमेश पाटलांकडे...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. झिशान सिद्दीकी यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची...