Wednesday, October 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुणे विधान परिषद शिक्षक मतदार संघात भाजपचा विजय! वा कौस्तुभ गावडेंनी मारली...

पुणे विधान परिषद शिक्षक मतदार संघात भाजपचा विजय! वा कौस्तुभ गावडेंनी मारली बाजी

पुणे | Pune
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या ३० तासांपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. ५ जागांपैकी दोन जागांचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पराभवाचा धक्का देत गावडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली. शिवसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप यांनाही मागे टाकत त्यांनी विजय मिळवला. या निकालामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंग पाटील यांनी विजय मिळवला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अजूनही मतमोजणी सुरु आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात सामना आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक, अदिती पोहरे, संगिता शिंदे आणि दत्तात्रय लहाने हे उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियाची रील्स ठरली गुन्हेगारीची शाळा; इन्स्टाग्रामवर जुळले धागे, तळेगावात उघडकीस आला थरार

कौस्तुभ गावडे यांना १८,३८५ मते; सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निकालात कौस्तुभ गावडे यांना १८,३८५ मते मिळाली, तर सचिन सानप यांना ११,९८३ मते मिळाली. त्यामुळे गावडे यांनी सानप यांच्यावर ६,४०२ मतांची आघाडी मिळवली. या निवडणुकीत भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावली होती. दुसरीकडे, सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्याने ही लढत अधिक चुरशीची झाली होती. मात्र, अंतिम निकालात कौस्तुभ गावडे यांनी आघाडी कायम ठेवत विजय संपादन केला.

दोन माजी शिक्षक आमदारांना धक्का
भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव केला आहे. एकीकडे काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये त्यांना बाद घोषित करण्यात आले. यावेळी त्यांना 8,965 मते मिळाली होती. तसेच, याआधी आमदार राहिलेल्या दत्तात्रय सावंत यांचादेखील पराभव झाला आहे.

काय म्हणाले कौस्तुभ गावडे?
संभाव्य विजयावर भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे म्हणाले की, “निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास होताच. हा पाच जिल्ह्यांतील शिक्षकांसह आपल्या कुटुंबासाठीही आनंदाचा क्षण आहे.” असे म्हणत आपला आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्या

महागाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची...

0
नवी दिल्ली | New Delhiकेंद्र सरकारने १.१६ कोटी कर्मचारी-पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केल्याने त्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि...