Thursday, October 29, 2026
Homeनाशिकदुष्काळाच्या सावटात सिंहस्थासाठी अतिरिक्त नियोजन; दहा टक्के पाणीकपातीचा निर्णय दिवाळीनंतरच

दुष्काळाच्या सावटात सिंहस्थासाठी अतिरिक्त नियोजन; दहा टक्के पाणीकपातीचा निर्णय दिवाळीनंतरच

नाशिक | प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, ग्रामीण भागातून शहराकडे होऊ शकणारे स्थलांतर आणि आगामी सिंहस्य कुंभमेळ्याची वाढती पाण्याची गरज, अशा तिहेरी आव्हानांमुळे नाशिकच्या पाणी नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांना १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश दिले असले, तरी नाशिक महापालिकेने अद्याप कपातीचा निर्णय घेतलेला नाही. दिवाळी आणि सिंहस्थाच्या ध्वजार रोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आता दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. नाशिक शहराची वाढती लोकसंख्या, दुष्काळामुळे ग्रामीण भागातून शहरात होऊ शकणारे स्थलांतर आणि सिंहस्थासाठी येणारे भाविक, साधू-संत यांचा विचार करून महापालिकेने वार्षिक पाणी नियोजन केले आहे. त्यानुसार, शहराच्या गरजांसाठी एकूण ८००५ दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणी आरक्षित करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

- Advertisement -

आगामी काळात शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याने उप-लब्ध जलसाठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये सिंहस्थाच्या ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या तयारीत महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी व्यस्त असल्याने पाणी आरक्षण आणि कपातीच्या प्रश्नावर अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक होण्याचे नियोजन आहे. या बैठकीला जलसंपदा गिरीश महाजन, स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शहराचे पाणी आरक्षण आणि १० टक्के पाणीकपातीबाबत अंतिम भूमिका निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

JIO आयपीओची शेअर बाजारात जोरदार लिस्टिंग! पहिल्याच दिवशी गुंतवणुकदार मालामाल, किती रुपयांवर लिस्टींग?

स्विमिंग पूल, सव्र्हिस स्टेशनही रडावर
संभाव्य पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्विमिंग पूल आणि याहनांच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये होणाऱ्या पाणी वापरावरही लक्ष ठेवले जात आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. पाणी आरक्षण आणि कपातीबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर परिस्थितीनुसार काही निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष नको : आ. फरांदे
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करताना शहराच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांनाही प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे. नाशिकमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी होणारे सिंहस्थाचे ध्वजारोहण आणि आगामी पर्वण्यांच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे तसेच शेतीसाठीच्या आवर्तनाचे काटेकोर नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करताना नागरिकांची तहान आणि शेतीसाठीची पाण्याची गरज यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. सिंहस्थाच्या पर्वण्यांदरम्यान नाशिकमध्ये मोठ्या संख्येने भाविक आणि साधू-म हंत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्यासह सिंहस्थाशी संबंधित घार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्थांसाठी पुरेसा पाणीसाठा राखणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Maharashtra Local Body Election : नाशिकसह राज्यातील ‘या’ जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीचा...

0
मुंबई | Mumbai दीर्घकाळापासून प्रशासकांच्या राजवटीखाली असलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यातील २० जिल्हा परिषदा...