Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनिफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका; गारपिटीमुळे द्राक्षबागांसह पिकांचे मोठे नुकसान

निफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका; गारपिटीमुळे द्राक्षबागांसह पिकांचे मोठे नुकसान

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

निफाड तालुक्यातील खानगाव, कोटमगाव तसेच लासलगाव परिसरात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. जोरदार पाऊस व गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षबागांसह गहू, कांदा, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे

खानगाव येथील शेतकरी गोरख भाऊसाहेब भिलोरे यांच्या चार एकर द्राक्षबागेला गारपिटीचा मोठा फटका बसला. त्यापैकी दोन एकर क्षेत्रातील द्राक्षांची काढणी सुरू असतानाच अचानक गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. गारांचा वेग अत्यंत तीव्र असल्याने द्राक्षबागांची पाने झडून पडली असून अनेक ठिकाणी वेल जमिनीवर कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

द्राक्षबागांबरोबरच काढणीला आलेल्या गहू व कांदा पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला. लासलगाव परिसरात अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. कांदा पिकात पाणी साचल्याने नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली पावसाचा जोर आणि गारपीटमुळे अनेक ठिकाणी गव्हाचे पिके अक्षरशः आडवे झाले

ताज्या बातम्या

Breaking News : सप्तशृंगीगडावरील घाटात स्विफ्ट कारने घेतला पेट; पोलिसांकडून वाहतूक...

0
नांदुरी | वार्ताहर Nanduri सप्तशृंगी गड घाटातील गणपती पॉईंटजवळ शनिवारी (दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या स्विफ्ट कारने अचानक पेट...