Wednesday, February 19, 2025
HomeनगरNitin Gadkari : …अन्यथा लोक म्हणतील भाजप अन् काँग्रेसमध्ये फरक काय?; नितीन...

Nitin Gadkari : …अन्यथा लोक म्हणतील भाजप अन् काँग्रेसमध्ये फरक काय?; नितीन गडकरींचं वक्तव्य

शिर्डी । Shirdi

आपण काँग्रेसचा पराभव केला इतकंच करण्यासाठी नाहीत. आपण लोकांसाठी काय केलं हे महत्वाच आहे. नाहीतर लोक म्हणतील काँग्रेस होत तेव्हाही असेच हाल होते आजही तेच आहेत, असं जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. शिर्डीत आज भाजपचे अधिवेशन पार पडत आहेत. यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

युद्ध संपलेलं आहे, विजय झालेला आहे, मात्र, या विजयाने स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपली असल्याचे गडकरी म्हणाले. निवडणुकीच्या जय पराजयात सर्वच असतं असं नाही. विदर्भातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडणूक लढले होते, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण ज्यांनी त्यांचा पराभव केला ते कोणाच्या लक्षात नाहीत, मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुर्ण विश्वाच्या लक्षात आहेत असे गडकरी म्हणाले. त्यामुळं विजयानेच लोक तुम्हाला ओळखतील असं नाही असंही गडकरी म्हणाले.

स्मार्ट शहरच नाहीतर स्मार्ट व्हिलेज देखील तयार झालं पाहिजे असे गडकरी म्हणाले. गावे ओस पडू लागली आहेत. लोक शहराकडे येत आहेत. गावातील स्थिती बिघडत चालली असल्याचे गडकरी म्हणाले. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. हीच शिवशाही महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे. ही जबाबादारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाची आहे, आमदारांची आहे, सर्व जनतेची असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

काँग्रेसची सत्ता गेली एवढच नाहीतर, जर आपण काहीच केलं नाहीतर लोक आपल्याला विचारतील की त्यांनी काही केलं नाही तुम्ही काय केलं? ⁠जे काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही ते आम्हाला करायचं आहे असे गडकरी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणुन गडचिरोलीची जबाबदारी त्यांनी घेतली याचा मला आनंद आहे. ⁠अनेकजण नक्षलवाद सोडून नोकरी करत आहेत. ⁠पुढील पाच वर्षांत गडचिरोली सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा जिल्हा असेल असेही गडकरी म्हणाले. आपल्याला फक्त ⁠स्मार्ट शहरच नाहीतर स्मार्ट व्हिलेज देखील झाली पाहिजेत असेही गडकरी म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या