Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यावाचा, नाशिकमध्ये काय घोषणा केल्या गडकरींनी...

वाचा, नाशिकमध्ये काय घोषणा केल्या गडकरींनी…

मुंबई-नाशिक रस्त्यावर पाच हजार कोटी खर्च करणार आहे. नाशिक-सुरत रस्तावर जलसंधारणाचे काम आमच्या विभागामार्फत करुन देण्यास तयार आहे. चाळीसगाव-नांदगाव रस्त्याचे काम करतांना बंधारा बांधला. ५६ क्यूबिक मीटर पाणी उपलब्ध झाले आहे. कुसुंबा -मालेगाव मार्गाचे काम करतांना जलसंधारणाचे काम केले आहे. त्यामुळे या परिसरातील आठ गावांना आठ मिलियन पाणीसाठी उपलब्ध झाला. सटाणा-चांदवड असा चौपदरी रस्ता मंजूर केला आहे. दोंडाईचा-मालेगाव रस्त्यात मालेगावला वळण मार्ग होणारसिन्नरसाठी बीओटी प्रकल्प दिला. त्यात अनेक अडचणी आल्या. ३.४ किमीची सिन्नर बायपास मंजूर केला आहे. शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर असा भक्तीमार्ग यात तयार होणार आहे.नवीन ग्रीन हायवे नाशिकमध्ये १३० किमी अंतराचा आहे. त्याचा उपयोग नाशिकच्या विकासासाठी कसा करता येईल, त्याचा विचार करा. आमच्याकडे पैशांची कमी नाही. माझे एकही आश्वासन खोटे ठरणार नाही. नाशिकसाठी लॉजेस्टिक पार्क बांधण्यास मी तयार आहे. नाशिक शहराचे आता डिकंजेस्टेन्ट करायला हवा.सुरत-नाशिक मार्ग पेठ-सुरगाणा तालुक्यातून जात आहे.या तालुक्यांचा विकासासाठी योजना तयार करा. नवीन नाशिकच्या विकासासाठी आता भुजबळ साहेब, महापौर, सर्व आमदारांनी एकत्र येऊन विचार करायला हवा…नवीन स्मार्ट सिटी या भागात करायला हवे.नाशिक-मुंबई रस्ताची दुरुस्ती महिन्याभरात होईल. नाशिक गोंदे वडपे ही ९९ किमीची सहा लेन मंजूर करु. दोन वर्षांत नाशिक- मुंबई प्रवास दोन तासांत होईल.उड्डान पुलामुळे नाशिकच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत १२ मिनिटांत जात येईल. तसेच नाशिक रोड ते द्वारका या ठिकाणी डबल डेकर फ्लॉयओव्हर १६०० कोटींचा प्रकल्प कालच मंजूर केला. या फ्लॉयओव्हच्या वरती मेट्रो असेल. त्याच्या उद्घाटनासाठी येत्या दोन वर्षांत मी पुन्हा येईल.उड्डान पुल चांगला तयार झाला आहे. खालच्या काही भागात सौदर्यकरण झाले आहे. आता नाशिकमधील चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पुलाचे खालील भागाचे  सौदर्यकरण करुन घ्या. नाशिकचे वैशिष्ट त्यात दिसेल.नाशिकचे हवामान खूप चांगले आहे. पर्यावरण अजून चांगले आहे. आता विकास होत आहे. परंतु विकास करतांना शहरातील पर्यावरणाचे वैशिष्ट कायम ठेवा. लाल दिवे मी संपवले. आता सायरन बंद करायचा आहे. आता रुग्णवाहिकेचा सायरन व पोलिसांच्या गाड्यांचा सायरनवर अभ्यास करत आहे. आता भारतीय वाद्य सर्व गाड्यांवर दिसेल, असा कायदा करणार आहे.नाशिक शहरातील उड्डानपूल आज बांधून पुर्ण झाला. उड्डानपुलाच्या आराखड्यात झालेल्या चुकांमुळे १०० जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात मला खूप दु:ख आहे. महाराष्ट्रात अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. झिरो अपघातसाठी प्रयत्न हवे.

- Advertisment -

ताज्या बातम्या