Thursday, May 2, 2024
Homeनगरनिवडुंगे येथील गणपती मंदिरात चोरी

निवडुंगे येथील गणपती मंदिरात चोरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील निवडुंगे येथील गणपती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे पंधरा हजार पाचशे रुपयांचे पितळी धातुच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली असून सोमवारी सकाळी गणपती मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. भागचंद काकासाहेब ससे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पाथर्डी-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या निवडुंगे गावातील गणपती मंदिराच्या ऐवाजावर डल्ला मारून अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. या घटनेत सात हजार रुपये किमतीचे एक मोठी व तीन लहान अशा चार पितळी समया, एक हजार रुपये किमतीचा पितळी मुकुट, तीन हजार रुपये किमतीच्या लहान व मोठ्या सात पितळी घंटा, दोन हजार रुपये किमतीचे पितळी पूजेचे ताट, अडीच हजार रुपये किमतीचे तांब्याच्या दोन कळ्या असा एकूण पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांने लंपास केला आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन नवगिरे हे या चोरीचा पुढील तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या