Friday, May 3, 2024
Homeनाशिकतुम्ही कोविशील्डची लस घेतलीये? दुसऱ्या डोससाठी असेल 'इतक्या' दिवसांची प्रतीक्षा

तुम्ही कोविशील्डची लस घेतलीये? दुसऱ्या डोससाठी असेल ‘इतक्या’ दिवसांची प्रतीक्षा

नाशिक | प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दुसऱ्या लसीच्या अंतरात वाढ केली होती. यापार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनेदेखील आता कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांसाठी दुसऱ्या लसीचा कालावधी वाढवला आहे.

- Advertisement -

उद्या (दि १५) पासून नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आता कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केलेला आहे.

१५ मे २०२१ या तारखेच्या आधी कोविशील्ड लसचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता ८४ दिवस झाल्यानंतरच दुसरा डोस मिळणार आहे.

त्यामुळे ज्या नागरिकांचे कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले असतील अशाच नागरिकांना कोविशील्ड लसचा दुसरा डोस मिळणार आहे.

तसेच कोवॅक्सिन या लसचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे अंतर पूर्वी प्रमाणे ४५ दिवसच असतील. तरी ज्या नागरिकांचे कोविशील्ड या लसचे ८४ दिवस पूर्ण झालेले नसतील अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या