Sunday, May 5, 2024
Homeनगरमाक्याचे लोकनियुक्त सरपंच नाथा घुले यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव ; शुक्रवारी बैठक

माक्याचे लोकनियुक्त सरपंच नाथा घुले यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव ; शुक्रवारी बैठक

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील माका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नाथा विश्‍वनाथ घुले यांचे विरुद्ध 14 पैकी 11 सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला असून तहसीलदारांनी या अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा-मतदानासाठी दि.11 जून रोजी सकाळी 11 वाजता माका ग्रामपंचायत कार्यालयात सर्व 14 ग्रामपंचायत सदस्यांची सभा बोलावली आहे.

माका ग्रामपंचायतीची निवडणूक तीन वर्षापूर्वी झाली होती. त्यात नाथा घुले हे जनेतेतून सरपंच पदावर निवडणूक आले होते. 13 सदस्यीय माका ग्रामपंचायतीमध्ये सध्या लोकनियुक्त सरपंचासह 14 सदस्य संख्या आहे.

- Advertisement -

परंतु माका ग्रामपंचायतीचे सरपंच नाथा घुले हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्‍वासात घेवून काम करत नाहीत, मनमानी पध्दतीने कारभार करुन इतर सदस्यांना विश्‍वासात न घेता ग्रामपंचायतीच्या हितास बाधा आणतात, मासिक सभेमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे प्रत्यक्ष ठराव लिहिले जात नाहीत, महिला सदस्यांना अरेरावीची भाषा वापरुन दबाव निर्माण करतात या कारणावरून उपसरपंचकमलाबाई मुरलीधर लोंढे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ रामभाऊ म्हस्के, रमेश निवृत्ती कराळे, श्रीमती सुशिलाबाई खंडेराव गुलगे, देविदास जयवंत भुजबळ, दिगांबर तुकाराम आखाडे, वनिता दिगंबर फलके, जयश्री ज्ञानदेव सानप, शोभा गोरक्षनाथ घुले, उषा सत्यवान पटेकर, सआशाबाई दिगंबर शिंदे या 11 सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला असून तहसीलदारांनी शुक्रवार दि. 11 जून रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या