Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यारुमाल नाही, मास्क लावा - पोलीस आयुक्त

रुमाल नाही, मास्क लावा – पोलीस आयुक्त

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचे वाढते रुग्ण नाशिककरांसाठी चिंतेची बाब ठरू पाहत आहे. करोना संक्रमण वाढीस लागल्याने त्याचा फैलाव रोखण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. सोबतच शहर आणि जिल्ह्यात विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

- Advertisement -

या अनुषंगाने बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी रविवार कारंजा, मेनरोड आदी गर्दीच्या भागात पाहणी करून विनामास्क फिरणार्‍या नागरिकांना ‘मास्क लावा, नाहीतर दंड भरा’असे सांगून रुमाल लावून फिरणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना मास्क चे वाटप केले. तर करोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना करून काहींवर दंडात्मक कारवाई केली.

पांडेय यांनी करोनाबाबतच्या कारवाईची माहिती घेऊन अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार परिसरात पाहणी केली. त्याचप्रमाणे दुकानदार, छोटे,

मोठे व्यावसायिक सात वाजता दुकाने बंद करत आहेत, की नाही, याचीही पाहणी केली. करोनाचा फैलाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका विविध उपाययोजना राबवून प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही बेफिकीर नागरिक गांभीर्याने घेत नसल्याने मनपा व पोलीस प्रशासनाच्यावतीने विनामास्क फिरणारे आणि गर्दी करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

करोना संक्रमण वाढीस लागल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी वर्दळीचा तसेच बाजारपेठ म्हणून परिचित असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड परिसराची पाहणी केली. मास्कऐवजी रुमाल बांधून फिरणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना पोलिस आयुक्तांनी मास्क वितरीत केले.

अंमलबजावणीसाठी पाहणी

करोनाबाधितांची संख्या दररोज दीड ते दोन हजाराने वाढत आहे. आधीच शहरात निर्बंध घालण्यात आले आहे. या निर्बंधांचे पालन होत आहे का, याची माहिती व प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरले.

रविवार कारंजा, मेनरोड, धुमाळ पॉईंट आदी भागात पाहणी करताना आयुक्तांनी नागरिक, व्यावसायिक, हॉकर्स यांना सुचना दिल्या. यावेळी सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, हेमंत सोमवंशी, पंचवटीचे विभागीय अधिकारी विवेक धांडे, पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या