पुणे | Pune
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहपुणे दौऱ्यावर आले असून, गुरुवारी रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. आज सकाळी ११:३५ वाजता एनडीएमधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पुण्यातील एनडीएमध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात बोलतांना अमित शाह म्हणाले, पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांनी नमन करतो. १७ व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले. एनडीए हे प्रेरणास्थान हे देशाच्या सुरक्षेच महत्वाचे ठिकाण आहे, म्हणून पेशवा बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणे हे सर्वाधिक उचित ठिकाण आहे.
वीर सावरकरांन महाराष्ट्राच्या भूमीतून उदाहरण घातले
“इंग्रजांच्यासमोर स्वराज्यासाठी लढण्याची वेळ आली, तेव्हा सर्वात आधी सिंहगर्जना टिळकांनी केली. वीर सावरकरांनी याच महाराष्ट्राच्या भूमीतून उदहारण घालून दिले. एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो हे सावरकर यांनी दाखवले. एनडीएची मूळ स्थापना झाली असेल, तेव्हा काय विचार केला असेल. तेव्हा वातावरण चांगले होते. म्हणून एनडीए बनवली आहे. पण इंग्रजांना माहीत नाही की या ठिकाणी येणारे शतकभर भारताच्या सुरक्षेचे स्थान होईल हे इंग्रजांना माहीत नाही” असे अमित शाह म्हणाले.
काही युध्दनीती कालबाह्य होत नाही
शाह पुढे म्हणाले की, बाजीराव यांच्या पुतळ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल. काही युद्धनीती कालबाह्य होत नाहीत. सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांची युद्धनीती यामध्ये साम्य आहे. बाजीरावांनी २० वर्षांत ४१ लढाया लढून त्या सर्व जिंकल्या. पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्यासारखा सेनापती दुसरा नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले. त्यांनी मिळविलेला विजय कल्पने पलिकडचा होता.
शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही
मराठा साम्राज्याचे तुकडे झाले तरी, पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांनी शेजारच्या संस्थांनातही प्रशासन उत्तम राबविले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची कल्पना केली, तेव्हा भूगोल वेगळा होता. शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. शिवरायांनंतर संभाजी महाराज, ताराराणी यांनी परंपरा पुढे नेली. बुंदेलखंड, तंजावर, गुजरातपासून अफगाणिस्तान, अटक, कटकपर्यंत स्वराजाचा विस्तार केला. निजामविरोधातील पालखेडचा मराठ्यांचा विजय अविस्मरणीय आहे. मी जेव्हा निराश होतो. तेव्हा छत्रपती शिवराय आणि बाजीरावांचा इतिहास आठवतो. बाजीरावांचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत.
भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंम्मत करणार नाही
“बाजीरावांचे पुतळे देशभरात आहेत. माझ्या गावात आहे. पण स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच आहे” असे अमित शाह म्हणाले. “श्रीमंत बाजीरावांच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. मला वाटते अनेक वर्ष भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही” असे अमित शाह म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





