Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील विसर्जन सोहळा पाहा ऑनलाईन

पुण्यातील विसर्जन सोहळा पाहा ऑनलाईन

पुणे

-उद्या गणपती विसर्जन. पुण्यातील गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ही गणेश भक्तांच्या आकर्षणाचा विषय असतो.

- Advertisement -

विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्याही विविध बहाग्तून गणेश भक्त खास हे मिरवणूक पाहण्यासाठी पुण्यात येतात. परंतु, त्यांच्या या आनंदावर यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे पाणी पडले आहे. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विसर्जन मिरवणूक निघणार नाही. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये निराशा पसरली आहे. दरम्यान, मानाच्या गणपती मंडळांनी भव्य मिरवणूक न काढता साधेपणाने विसर्जन करायचं ठरवलं आहे तर महापालिकेवर ताण नको म्हणून विसर्जन हौदाची व्यवस्था मंडळं स्वतः करणार आहेत आणि त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करणार आहेत.

पुणेकरांनी अनंत चतुर्दशीला विसर्जन सोहळा ऑनलाईनच पाहावा, असं आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक बंधने घाल्यात आली आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना विसर्जन स्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्याच्या मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. मिरवणूक नसल्याने नागरिकांनी गर्दी करू नये. घरात बसून ऑनलाईन विसर्जन सोहळा पाहावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

यंदा परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी 10.30 वाजता कसबा गणपतीला हार अर्पण करतील आणि त्यानंतर 11.30 ला कसबा गणपतीचं विसर्जन होईल. त्याचप्रमाणे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपती 12.15 वाजता विसर्जित होईल. मानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या गुरुजी तालीम आणि तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचं विसर्जन दुपारी 1 आणि 1.45 वाजता होईल. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा 2.30 वाजता विसर्जित होईल.

त्यानंतर श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दुपारी 3.15 ला विसर्जन होईल. सर्वाधिक आकर्षणाचा विषय असलेल्या दगडूशेठ गणपतीचं विसर्जन सूर्यास्तावेळी होणार आहे. तर अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचं संध्याकाळी 7 वाजता विसर्जन होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या