Friday, May 3, 2024
HomeUncategorizedबाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी एकाही झाडाची कत्तल नको

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी एकाही झाडाची कत्तल नको

औरंगाबाद- aurangabad

एमजीएम (MGM campus) परिसरातील (Priyadarshini Udyan) प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकाचे काम सुरु असून या प्रकल्पासाठी झाडांची अनावश्यक कत्तल होत असल्याची याचिका (Mumbai High Court) मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -

यासंदर्भात कोर्टाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि तीन वकिलांच्या समितीने स्वतंत्रपणे पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अवहलावर चर्चा झाल्यानंतर कोर्टाने नकाशात नमूद व्हीआयपी गेटची आवश्यकताच काय, असे म्हणत यापुढे उद्यानातील एकाही झाडाची कत्तल होता कामा नये, अशा खड्या शब्दात महानगरपालिकेला सुनावले.

फुडकोर्ट व गेटची आवश्यकता काय?

उद्यानातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबाबत अजिबात शंका नसून त्याभोवती उभारण्यात येणार फूड प्लाझा आणि व्हीआयपी गेटमुळे स्मारकाच्या उद्देशाला बाधा निर्माण होईल, असे मत कोर्टाने मांडत यापुढे उद्यानातील एकाही झाडाची कत्तल होणार नाही, अशी खबरदारी मनपा प्रशासनाने घ्यावी, असे आदेश कोर्टाने दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या