Friday, May 3, 2024
Homeनाशिकबाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती

बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती

उमराणे । वार्ताहर Umrane

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेत शासनाने अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीस मान्यता दिली.

- Advertisement -

उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी केली आहे. या मंडळाच्या मुख्य प्रशासकपदी सोनाली विलास देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमराणे बाजार समितीवर गत दीड वर्षापासून प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. देवळा तालुका उपनिबंधक संजय गिते व आता सुजय पोटे हे कामकाज बघत होते. शासन निर्णयानुसार बाजार समितीच्या निवडणुका २४ ऑगस्टपासून सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक खरे यांनी अशासकीय सदस्यांचे प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

या मंडळात मुख्य प्रशासक सोनाली विलास देवरे तसेच प्रशासकपदी देवानंद यशवंत वाघ, सचिन रामदास देवरे, दिलीप निंबा ठाकरे, केशवराव यादव शेवाळे, गणेश देवाजी गांगुर्डे, संजय भिका देवरे, पोपट नारायण खैरनार, नामदेव दौलत खैरनार, काशिनाथ रतन अहिरे, विश्वास बळीराम वाघ, मनीराम दामू अहिरे, गौरव कौतिक खैरनार, मनीषा रामराव ठाकरे, शोभा महेंद्र पाटील, अनिता विश्वास बस्ते, प्रवीण दामू देवरे, महेंद्र शांतीलाल मोदी व दीपक नारायण आहेर या १९ सदस्यांचा सहभाग आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या